‘Vicky Kaushal हा बेशरम, कारण…’, सलमान खानसोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची जीभ घसरली

सलमान खान - विकी कौशल यांच्यातील वाद टोकाला! प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, 'बेइजत्त होना एक बात है और...', सध्या सर्वत्र प्रसिद्ध अभिनेत्यांच्या व्हिडीओची चर्चा..

'Vicky Kaushal हा बेशरम, कारण...', सलमान खानसोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची जीभ घसरली
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 12:39 PM

अबू धाबी : अभिनेता सलमान खान सध्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबीत आहे. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबी याठिकाणी सलमान खान याच्यासोबतच अन्य सेलिब्रिटी देखील जमले आहेत. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओसध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी चर्चा रंगत आहे. पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना एका व्हिडीओने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सलमान खान याच्या बॉडीगार्डने अभिनेता विकी कौशल याला धक्का मारला, तर भाईजानने विकीकडे दुर्लक्ष केलं..

सलमानच्या बॉडीगार्डने ज्याप्रकारे विकीला बाजूला केलं, ते पाहून चाहत्यांनीही राग व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सलमान आणि विकी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी सलमान खान याला पाठिंबा दिला तर, काही चाहते विकी कौशलच्या पाठिशी खंबीर उभे राहिले..

हे सुद्धा वाचा

व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने तर विकी कौशल याच्यावर निशाणा साधला आहे. विकीवर निशाणा साधणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आणि विश्लेषक कमाल राशिद खान म्हणजे केआरके आहे. केआरके याने एक ट्विट करत याप्रकरणी स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘अपमान होणं एक गोष्ट आहे आणि बेशरम असणं दुसरी गोष्ट आहे.. तर सांगायचं झालं तर विकी कौशल बेशरम आहे.. इतका अपमान होवून देखील विकी आयफामधून गेला नाही…’ सध्या सर्वत्र केआरके याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.. शिवाय केआरके याच्या ट्विटवर नेटकरी कमेंट करत आहेत..

महत्त्वाचं म्हणजे, ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेबद्दल खुद्द विकी कौशल याने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेता म्हणाला, ‘कही गोष्टींबद्दल अनेकदा अर्थ नसलेल्या चर्चा सुरु असतात. वास्तवमध्ये गोष्टी दिसतात तशा नसतात. व्हिडीओमध्ये जे दिसत आहे, तसं काहीही नाही.. यावर बोलण्याचा काहीही अर्थ नाही…’ असं विकी म्हणाला..

व्हिडीओनंतर अनेक चर्चा रंगत आहेत. पण त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान पुरस्कार सोहळ्यात विकीला मिठी मारताना दिसला.. सोशल मीडियावर दोघांच्या व्हिडीओची चर्चा तुफान रंगत आहे. यावर आता सलमान खान काय बोलते यावर चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.