‘माझ्या वडिलांचा जीव सुशांतसारखा जाऊ नये’; KRK च्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे विनंती

फैजलने केआरकेच्या अकाऊंटवरूनच काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली आहे.

'माझ्या वडिलांचा जीव सुशांतसारखा जाऊ नये'; KRK च्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे विनंती
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 5:07 PM

अभिनेता आणि समिक्षक कमाल आर खानला (KRK) 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. 2020 मध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्याने त्याला अटक झाली. त्यानंतर आठवडाभराच्या आतच 3 सप्टेंबर रोजी त्याला दुसऱ्यांदा अटक झाली. 2021 मधील एका विनयभंगाच्या प्रकरणात त्याला दुसऱ्यांदा अटक (Arrest) करण्यात आली. 4 सप्टेंबर रोजी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. आज (गुरुवार) त्याला जामिन मिळाला असून केआरके प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळालं आहे. केआरकेला जामिन मिळाल्याच्या काही तासांनंतर त्याचा मुलगा फैजलने काही ट्विट्स केले आहेत.

फैजलने केआरकेच्या अकाऊंटवरूनच काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

‘मी केआरकेचा मुलगा फैजल कमाल आहे. काही लोक माझ्या वडिलांना जीव घेण्यासाठी त्यांना मुंबईत त्रास देत आहेत. मी 23 वर्षांचा असून लंडनमध्ये राहतोय. माझ्या वडिलांची कशी मदत करावी हे मला माहीत नाही. मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या वडिलांचे प्राण वाचवावेत. मी आणि माझी बहीण त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही’, असं त्याने एका ट्विटमध्ये लिहिलंय.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने पुढे लिहिलंय, ‘मी लोकांनाही विनंती करतो त्यांनी माझ्या वडिलांना पाठिंबा द्यावा. त्यांचा मृत्यू सुशांत सिंह राजपूतसारखा होऊ नये, हीच आमची विनंती आहे.’

कमाल आर खानला आज काही अटीशर्तींवर जामिन मंजूर करण्यात आला. दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी त्याला पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. केआरके चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वादग्रस्त ट्विट्समुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला होता. त्याने काही हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.