कपिल शर्मा – कृष्णा अभिषेक यांच्यात वाद? अभिनेत्याने सांगितलं अमेरिका दौऱ्यावर न जाण्याचं कारण

द कपिल शर्मा शो हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. याआधीही कपिलचे शोमधील काही कलाकारांसोबत वाद झाले. सुनील ग्रोवरने या वादानंतर कपिलचा शो सोडला होता. तो पुन्हा या शोमध्ये परतलाच नाही.

कपिल शर्मा - कृष्णा अभिषेक यांच्यात वाद? अभिनेत्याने सांगितलं अमेरिका दौऱ्यावर न जाण्याचं कारण
Kapil Sharma and Krushna AbhishekImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 10:41 AM

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. दर आठवड्याला या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. अचूक टायमिंग आणि जबरदस्त विनोदकौशल्याने कपिल प्रेक्षकांसोबत या सेलिब्रिटींना खळखळून हसवतो. आता लवकरच या शोची टीम अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्याच्या आधीच कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजीव ठाकूर आणि कीकू शारदा यांच्यासह अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं नुकतंच कपिलने जाहीर केलं. मात्र शोमध्ये सपनाची भूमिका साकारणारा कृष्णा त्यांच्यासोबत जाणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

कृष्णा आणि कपिलमध्ये वाद झाल्याची याआधीही चर्चा होती. त्यामुळे पुन्हा एकदा दोघांमध्ये काहीतरी बिनसलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता खुद्द कृष्णाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वकाही ठीक आहे. मात्र माझी आधीची काही कामं रखडली असल्याने मी अमेरिकेच्या दौऱ्यावर नंतर जाईन”, असं तो म्हणाला. युएस टूरवर कीकू शारदा, राजीव ठाकूर आणि इतर कलाकारसुद्धा सहभागी होतील.

कपिल शर्मा आणि त्याची टीम येत्या 15 जुलै रोजी न्यूजर्सीमध्ये लाइव्ह परफॉर्म करणार आहे. लोकल प्रमोटर सॅम सिंह याविषयी म्हणाले, “चांगल्या गोष्टींना थोडा अवधी लागतोच. आम्हाला गेल्या वर्षी व्हिसाची मंजुरी मिळाली होती. मात्र अपॉईंटमेंटला विलंब लागल्याने अमेरिकी वाणिज्य दूतावासांकडून व्हिसावर मोहर लावण्याची तारीख मिळू शकली नाही. मात्र या वर्षी सर्व औपचारिकता वेळेवर पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे कपिल शर्माची टीम अमेरिकेतील चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.”

हे सुद्धा वाचा

द कपिल शर्मा शो हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. याआधीही कपिलचे शोमधील काही कलाकारांसोबत वाद झाले. सुनील ग्रोवरने या वादानंतर कपिलचा शो सोडला होता. तो पुन्हा या शोमध्ये परतलाच नाही. त्यानंतर आता कृष्णासोबतही कपिलचा वादा झाला की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

कपिल शर्माच्या शोमध्ये आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अजय देवगण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, सोनू निगम यांसारखे मोठे स्टार्स पाहुणे म्हणून दिसले आहेत. हे सर्व मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटांच्या किंवा कामाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येत असतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.