Marathi Serial : ‘कारभारी लयभारी’ मालिकेत लगीनघाई, राजवीर आणि प्रियांकाचा विवाह सोहळा
एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’मध्ये अनुभवता येणार आहे. (Laginghai, Rajveer and Priyanka's wedding ceremony in 'Karbhari Laibhari' serial)
मुंबई : सध्या तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अशा बदलांमध्ये एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laibhari) मालिकेमध्ये अनुभवता येणार आहे. राजकारणावर बेतलेली ‘कारभारी लयभारी’ मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेलं राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे. (Rajveer and Priyanka’s wedding ceremony in ‘Karbhari Laibhari’ serial)
लग्नाची खास गोष्ट
पियू आता मस्त सजून धजून लग्नासाठी तयार होतेय. तिला घरची आठवण येत आहे. वीरुसुद्धा छान नवरदेवासारखा सजला आहे. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवतांना दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे घरासमोरच लग्न लावलं जातंय. मात्र अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे म्हणून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय. काकी मुद्दाम अंकुशरावांपर्यंत खबर पोहोचेल अशी व्यवस्था करते. लग्न विधी सुरु असताना कन्यादानाचा विषय येतो आणि त्याचवेळी अंकुशराव दारात पोहोचतो. अंकुशराव लग्नाचा तमाशा करतो. पियूला खेचून नेत तिला जीवे मारण्याची भाषा करतो. काकीला सगळ्याची मजा येतेय तरी पण तीमध्ये पडते. अंकुशरावला समज द्यायला पोलिसांनामध्ये आणते. त्यानंतर पियू पोलिसांना सांगणार आहे की मी माझ्या मर्जीनं लग्न करतेय. अंकुशरावचा पाणउतारा होतो…अपमानित होऊन तो निघू लागतो. अखेर सर्व अडचणींवर मात करून राजवीर आणि प्रियांका चा विवाह सोहोळा संपन्न होतो.
हा सगळा सोहळा तुम्हाला कारभारी लयभारी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Marathi Serial : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या सेटवर चिमुकला चाहता; पाहा काय झाले?
Marathi Movie : ‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’,बाजीप्रभूंचा पराक्रम झळकणार रुपेरी पडद्यावर