Lata Mangeshkar : अविवाहित असतानाही लतादीदी का लावायच्या सिंदूर ?

उभ्या आयुष्यात फक्त आणि फक्त संगीतावर आकंठ प्रेम करणाऱ्या लतादीदी अविवाहित असतानाही लावायाच्या सिंदूर; खुद्द लतादीदी यांनी सांगितलं होतं त्याच्या सिंदूरचं रहस्य...

Lata Mangeshkar : अविवाहित असतानाही लतादीदी का लावायच्या सिंदूर ?
Lata Mangeshkar Death Anniversary : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर अर्थातचं आपल्या लतादीदी आज आपल्यात नाहीत, लतादीदींच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरी देखील दीदी आपल्यातच आहेत... आशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी देशाला दीदी पोरकं करून गेल्या, आज या दिवसाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण आज लतादीदी अनेक गोष्टी पुढच्या पिढीसाठी मागे ठेवून गेल्या. अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहेत. लतादीदी यांच्या निधनानंतर देशात प्रत्येकाच्या मनात भावना दाटून आल्या होत्या. अभिनेत्री तबस्सुम यांनी देखील दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला. तबस्सुम यांनी आयुष्यातील अनेक क्षण लतादीदी यांच्यासोबत व्यतीत केले. एका मुलाखतीत तबस्सुम यांनी सांगितलं, 'लतादीदी यांच्यासारखं दुसरं कोणीही नाही..' एवढंच नाही तर, दीदींच्या अनेक आठवणी तबस्सुम यांनी सांगितल्या. कोणाच्या नावाचं सिंदूर लावयच्या लतादीदी तबस्सुम यांनी लतादीदी अविवाहित असताना का आणि कोणाच्या नावाचं सिंदूर लावचयच्या याबद्दल सांगितलं. तबस्सुम यांनी सांगितलं, 'मी लतादीदी यांच्या अनेक मुलाखती घेतल्या. पण टेलिव्हीजनवर मुलाखात घेण्याची संधी कधी मिळाली नाही. एकदा दीदींना विचारलं होते लग्न झालेलं नसताना तुम्ही कोणाच्या नावाचं सिंदूर लावता?' Lata Mangeshkar
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 1:07 PM

Lata Mangeshkar Death Anniversary : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर अर्थातचं आपल्या लतादीदी आज आपल्यात नाहीत, लतादीदींच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरी देखील दीदी आपल्यातच आहेत… आशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी देशाला दीदी पोरकं करून गेल्या, आज या दिवसाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण आज लतादीदी अनेक गोष्टी पुढच्या पिढीसाठी मागे ठेवून गेल्या. अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहेत.

लतादीदी यांच्या निधनानंतर देशात प्रत्येकाच्या मनात भावना दाटून आल्या होत्या. अभिनेत्री तबस्सुम यांनी देखील दीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला. तबस्सुम यांनी आयुष्यातील अनेक क्षण लतादीदी यांच्यासोबत व्यतीत केले. एका मुलाखतीत तबस्सुम यांनी सांगितलं, ‘लतादीदी यांच्यासारखं दुसरं कोणीही नाही..’ एवढंच नाही तर, दीदींच्या अनेक आठवणी तबस्सुम यांनी सांगितल्या.

कोणाच्या नावाचं सिंदूर लावयच्या लतादीदी ?

तबस्सुम यांनी लतादीदी अविवाहित असताना का आणि कोणाच्या नावाचं सिंदूर लावचयच्या याबद्दल सांगितलं. तबस्सुम यांनी सांगितलं, ‘मी लतादीदी यांच्या अनेक मुलाखती घेतल्या. पण टेलिव्हीजनवर मुलाखात घेण्याची संधी कधी मिळाली नाही. एकदा दीदींना विचारलं होते लग्न झालेलं नसताना तुम्ही कोणाच्या नावाचं सिंदूर लावता?’

तबस्सुम यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना लतादीदी हासल्या आणि म्हणाल्या, ‘माझ्या माथ्यावर असलेलं सिंदूर संगीताच्या नावाचं आहे.’ लतादीदी यांच्यासाठी संपूर्ण विश्व म्हणजे संगीत होतं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीतावर प्रेम केलं. लतादीदींनी दिलेलं हे उत्तर हृदय पिळवटून टाकणार आहे. लतादीदींनी उभ्या आयुष्यात संगीतावर आकंठ प्रेम केलं.

भारतीय संगीतविश्वात लतादीदी यांचं योगदान अत्यंत मोलाचं. संगीत कलाकार म्हणून त्यांनी अनेक गाणी गायली. आज दीदी आपल्या नसल्यातरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यासोबत असतील. कारण एका कलाकाराचं निधन कधीच होत नाही. कलाकाराची कला कायम जिवंत असते. लतादीदी देखील त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येत भारतीयाच्या मनात आहेत.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ सली मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला होता. लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात मोठ्या कन्या होत्या. लतादीदी यांच्यानंतर मीना, आशा आणि उषा यांचा जन्म झाला. त्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.