‘वरिष्ठांनी आम्हाला आमचं काम…’, सुशांत याचं शवविच्छेदन करताना नक्की काय घडलं?
कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानंतर सुशांत प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sushant Singh Rajput case : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) १४ जून २०२० मध्ये वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पण आता अभिनेत्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. कूपर रुग्णाालयातील कर्मचारी मॉर्चरी सर्वेंट रूपकुमार शाह (Mortuary Servant Roopkumar Shah) यांनी सुशांत सिंग प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. शाह यांच्या दाव्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) देखील प्रतिक्रिया दिली आहे.
कूपर रुग्णालयाचे कर्मचारी शाह म्हणाले, ‘सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या आहे. अभिनेत्याच्या शरीरावर जे व्रण होते, असे व्रण आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर नसतात. त्याच्या डोळ्यांवर मार लागल्याचे ठसे होते. शरीरावर जखमा होत्या, हात-पाय तुटल्यासारखे होते. तेव्हा मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं, पण त्यांनी मला माझं काम करण्यास सांगितलं.’ आता शाह यांच्या वक्तव्यानंतर सुशांत प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुशांतच्या बहिणीचं ट्विट- शाह यांना धक्कादायटक दावा केल्यानंतर सुशांतच्या बहिणीने शाह यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली. श्वेता ट्विट करत म्हणाली, ‘शाह सुरक्षित राहतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. यात थोडं जरी तथ्य असेल तर सीबीआयने या प्रकरणाकडे लक्ष द्यायला हवं अशी आमची विनंती आहे.’
We have to make sure safety of RoopKumar Shah is insured. CBI Make SSRCase TimeBound @narendramodi @AmitShah #SushantSinghRajput https://t.co/suY8sCuwrU
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) December 26, 2022
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अद्याप कोणताच निकल न लागल्यामुळे आम्हाला वाईट वायतंय… असं देखील अभिनेत्याची बहिण ट्विट करत म्हणाली. सुशांतच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ माजली. आता जवळपास दोन वर्षांनी शाह यांनी केलेल्या दाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेता सुशांतने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. फार कमी कालावधीत अभिनेत्याचे चाहत्यांच्या मनात घर केलं. पण १४ जून रोजी गळफास घेवून अत्महत्या केली आणि आपला जीवन प्रवास संपवला.