Chirag Paswan | सुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीबाबत चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. (Chirag Paswan calls Uddhav Thackeray)
मुंबई : केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे चिरंजीव लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाची चर्चा केली. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गटबाजीबद्दल बिहारमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. (Chirag Paswan calls Uddhav Thackeray)
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणाची निःपक्षपाती चौकशीची मागणी चिराग पासवा यांनी केली. शिवाय चिराग पासवान यांनी बॉलिवूडमधील गटबाजीवर प्रकाश टाकणारे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलं आहे.
#ShushantSinghRajput की आत्महत्या मामले मामले के निष्पक्ष जांच के लिए आदरणीय महाराष्ट्र सीएम उद्धव ठाकरे जी से फोन पर बात हुई।मामले की पूरी जानकारी संक्षेप में दी। @CMOMaharashtra मुख्यमंत्री जी ने भरोसा दिलाया इस मामले की पुलिस जाँच कर रही है किसी भी दोषी को छोड़ा नहीं जाएगा। pic.twitter.com/OALUVPjhmq
— युवा बिहारी चिराग पासवान (@ichiragpaswan) June 22, 2020
चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही पत्र लिहून सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंशी बोलावे असे म्हटले होते. त्यानंतर चिराग यांनी स्वत: फोन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला.
दरम्यान, “सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्याप्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. कुणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा होईल”, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी चिराग पासवान यांना दिलं.
आतापर्यंत 16 जणांचे जबाब
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस कसोशीने तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंत 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहिण, वडील, घरातील नोकर यांचा समावेश आहे.
वांद्रे पोलीस आज आणखी तिघांचे जबाब घेत आहेत. सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर हिचा जबाब घेतला जाणार आहे. रोहिणी ही सुशांतची जुनी मैत्रीण होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती सुशांतच्या संपर्कात होती. इतर व्यक्तींच्या जबाबात रोहिणीचा उल्लेख झाल्याने आता तिचाही जबाब नोंदवला जाणार आहे. रोहिणी आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी
सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.
सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या
सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
(Chirag Paswan calls Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या
Sushant Singh Rajput Investigation | सुशांतच्या जुन्या मैत्रिणीचाही जबाब, रोहिणी अय्यरची पोलीस चौकशी
Sushant singh rajput suicide: रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मॅनेजरला तिसऱ्यांदा बोलावलं, मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग