Love Life | तब्बल 7 वर्ष ‘या’ अभिनेत्यासोबत लिव्हईनमध्ये शाही कुटुंबाची लेक, लग्नाची वेळ आल्यावर…
Love Life | 'या' अभिनेत्यासोबत लिव्हईनमध्ये राहण्याची आईनेच दिली परवानगी; ७ वर्ष अभिनेत्यासोबत लिव्हईनमध्ये राहिल्यानंतर शाही कुटुंबातील लेकीसोबत... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा... आता काय करते शाही कुटुंबाची लेक?

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यामध्ये स्वतःचं स्वार्थ पाहायचं नसतं. स्वतःच्या गरजांपूर्वी आपल्या आवडत्या व्यक्तीचा अनेकदा विचार कराला लागतो.. एवढंच नाही तर, प्रेमात अनेक गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आवडी – निवडी जपाव्या लागतात. बॉलिवूडमध्ये देखील असे अनेक कपल आहेत, जे चाहत्यांना कायम कपल गोल्स देताना दिसतात. चाहते देखील अनेक सेलिब्रिटी कपल्सना फॉलो करताना दिसतात. आता देखील अशाच एका सेलिब्रिटी कपलची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडच्या एक अभिनेत्याने शाही कुटुंबाच्या लेकीला पाहिलं आणि पहिल्या नजरेतच अभिनेता तिच्या प्रेमात पडला… तिने देखील अभिनेत्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि नात्याला नवं नावं देण्याचा निर्णय घेतला..
सध्या ज्या शाही कुटुंबातील लेकीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून, पतौडी कुटुंबाची लेक आणि अभिनेता सैफ अली खान याची बहीण सोहा अली खान (Soha Ali Khan) आहे. सोहा आणि अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) फार कोणाला माहिती नाही. पण दोघांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही.
कुणाल आणि सोहा यांची पहिली भेट सिनेमाच्या सेटवर झाली आणि पहिल्याच नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. एका मुलाखतीत खुद्द सोहा हिने कुणाल याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘९९ मध्ये आम्ही चांगले मित्र होतो. मला कुणाल याची स्माईल प्रचंड आवडली. त्याचा शांत स्वभाव देखील मला फार आवडला. दिवसागणिक कुणाल याच्याप्रती माझं प्रेम वाढत होतं…’ असं सोहा म्हणाली.




मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल सात वर्ष कुणाल आणि सोहा लिव्हइन रिलेशनमध्ये राहत होते. महत्त्वाचं म्हणजे लिव्हइन रिलेशनमध्ये राहण्यासाठी सोहा हिची आई म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी लेकीला परवानगी दिली होती. दोघांना देखील एकमेकांची साथ आवडली आणि सात वर्षांनंतर सोहा आणि कुणाल यांनी लग्न करण्याचा विचार केला.
सोहा आणि कुणाल यांनी २०१५ मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव इनाया असं आहे. सोहा कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सांगायचं झालं तर, सोहा हिला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
‘प्यार में ट्विस्ट’, ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता-आहिस्ता’, ‘खोया खोया चांद’, ‘साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्न्स’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोहा हिने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोहा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.