चिठ्ठी लिहिली, गुलाबही दिलं… अशी झाली रितेश – जिनिलिया यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात
रितेश - जिनिलिया यांच्या जोडीने चाहत्यांना लावलंय 'वेड'... पहिल्या भेटीनंतर अशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात, वाचून तुम्हालाही वाटेल 'लय भारी'... रितेश - जिनिलिया यांची भन्नाट 'प्रेम कहाणी'

Riteish Deshmukh – Genelia Dsouza : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (genelia d’souza) यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे.रितेश आणि जिनिलिया कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. रितेश आणि जिनिलिया यांच्यासारखंच आपलं देखील नातं असावं अशी अनेकांची इच्छा आहे. आज रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियाच्या माध्यामातून खऱ्या प्रेमाचं महत्त्व सतत चाहत्यांना सांगताना दिसतात. पण जेव्हा व्हिडीओ कॉलचा जमाना नव्हाता तेव्हा रितेश आणि जिनिलिया यांच्यातील प्रेम बहरलं.
रितेश याने एका मुलाखतीत एकमेकांना दिलेल्या भेटवस्तूंबद्दल सांगितलं. अभिनेता म्हणाला, ‘जिनिलिया हिच्याकडे आजही ती खास भेटवस्तू आहे. मी जिनिलिया हिला एक गुलाब दिलं होतं. ते गुलाब आजही जिनिलियाने एक पुस्तकात जपून ठेवलं आहे. आज त्या गुलाबाला २० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘आम्ही डेट करत होतो तेव्हा व्हिडीओ कॉलसारखी कोणतीही गोष्ट नव्हती आणि आउटडोर शुटिंगमध्ये कॉल करणं फार खर्चिक होतं. मी ३० दिवसांसाठी परदेशात शुटिंगमध्ये व्यस्त होतो. तर तेव्हा जिनिलियाने साऊथचे सिनेमे साईन केलं होते. त्यामुळे आम्ही एकमेकांना चिठ्ठी लिहिण्याचा निर्णय घेतला.’
View this post on Instagram
रितेश आणि जिनिलिया ३० दिवस एकमेकांना चिठ्ठी लिहित होते. तीस दिवस एकमेकांना लिहिलेल्या चिठ्ठ्या आजही रितेश – जिनिलिया यांच्याकडे आहेत. रितेशने मुलाखतीत ‘मस्ती’ सिनेमातील वेडिंग सिक्वेंसबद्दल देखील सांगितलं. (genelia d’souza – Riteish Deshmukh love story)
अभिनेता म्हणाला, ‘ मस्ती सिनेमात एक वेडिंग सिक्वेंस होता. ज्यासाठी आम्ही नवं वधू – वराप्रमाणे तयार झालो होतो. म्हणून आम्ही व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो आणि फोटो काढले. कारण आम्हाला माहिती होतं खऱ्या आयुष्यात आमचं लग्न होवू शकत नाही. मला आजही तो क्षण आठवतो जेव्हा मी जिनिलिया हिला मंगळसूत्र घातलं होतं.’
पण रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांची लव्हस्टोरी पूर्ण केली. शिवाय रितेश आणि जिनिलिया यांनी मोठ्या पडद्यावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘वेड’ सिनेमातून रितिश आणि जिनिलिया यांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि चाहत्यांना वेड लावलं. (Riteish Deshmukh – Genelia Dsouza)
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. दोघांचे रिल्स चाहत्यांना प्रचंड आवडतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रितेश आणि जिनिलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. (deshmukh family)