Luck Down | ‘लॉकडाऊन’ नव्हे ‘लक डाऊन’, अंकुश चौधरीची प्राजक्ता माळीसह जमणार जोडी!

धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार आहे.

Luck Down | ‘लॉकडाऊन’ नव्हे ‘लक डाऊन’, अंकुश चौधरीची प्राजक्ता माळीसह जमणार जोडी!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 2:17 PM

मुंबई : सध्या कोरोना महामारीच्या काळात आता ‘लॉकडाऊन’ हा शब्द कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द सगळ्यांनाच नकोसा झाला आहे. पण ‘लॉकडाऊन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाउन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा. 2020मध्ये जर ‘लॉकडाऊन’ असेल तर, 2021 ‘लक डाऊन’ असू शकतो, असे म्हणत कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोणतंही कोडं नसून, आगामी मराठी चित्रपटाचं नाव आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Luck Down Marathi Film starring Ankush Chaudhari and Prajakta Mali).

इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित ‘लक डाऊन’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि चित्रपटाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून, हे कलाकार देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

निर्मात्यांनी कथानक जरी अद्याप गुलदस्त्यात ठेवले असले, तरी या चित्रपटाचे हटके शीर्षक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. लॉकडाउनमुळे 2020 वर्ष जरी टेन्शनमध्ये गेलं असलं तरी पुढील येणारं वर्ष सर्वांसाठी आनंदी आणि मजेशीर असणार आहे.

वर्षा अखेरीस चित्रीकरणास सुरुवात

विशेष म्हणजे 2020मध्ये अंकुशने चित्रीकरण सुरू केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. अंकुश चौधरी जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ नावाच्या राजकीय कथानकावर आधारित चित्रपटात झळकला होता. यात अंकुश चौधरीसह सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अलका कुबल, सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. प्राजक्ता माळीनेही अलीकडेच हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या तिच्या ट्रॅव्हल टेलिव्हिजन शोचे चित्रीकरण संपवले आहे (Luck Down Marathi Film starring Ankush Chaudhari and Prajakta Mali).

2021मध्ये मराठी चित्रपटांची मेजवानी

अनलॉक सुरू झाल्यानंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. याची घोषणा झाल्यानंतर अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच सखी गोखले, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे अभिनीत निखिल महाजनच्या ‘गोदावरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये सुरू झाले आहे. तर, वैभव तत्ववादी आणि अंजली पाटील यांनीही पुण्यात एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे.

भारतातच नव्हे तर, परदेशातही मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाचे बिगुल वाजले आहे. सध्या सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे लंडनमध्ये लोकेश गुप्ते यांच्या ‘डेट भेट’ चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहेत. गजेंद्र अहिरे यांनी अहमदनगरमध्ये ‘अडकित्ता’ आणि ‘विद्यापीठ’, तर लंडनमध्ये ‘श्रीमती अंब्रेला’ आणि ‘रिटर्न जर्नी’ या चार चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

(Luck Down Marathi Film starring Ankush Chaudhari and Prajakta Mali)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.