Maanayata Dutt च्या प्रेमात संसूबाबाने उचललं मोठं पाऊल; पत्नीच्या जुन्या सीडी, डीव्हीडी हटवल्या आणि…

लग्नाआधी असं काम करायची संजय दत्त याची तिसरी पत्नी; मान्यता दत्ता हिच्या जुन्या सीडी, डीव्हीडी मार्केटमधून हटवण्यासाठी संजूबाबाने मोजली मोठी किंमत...

Maanayata Dutt च्या प्रेमात संसूबाबाने उचललं मोठं पाऊल; पत्नीच्या जुन्या सीडी, डीव्हीडी हटवल्या आणि...
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 2:18 PM

मुंबई | 22 जुलै 2023 : अभिनेता संजय दत्त कायम आपल्या खास अंदाजामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील अभिनेत्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. संसूबाबाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला. वयाच्या ५० व्या वर्षी जेव्हा अभिनेत्याने मान्यता दत्त (Maanayata Dutt) हिच्यासोबत लग्न केलं, तेव्हा अभिनेता तुफान चर्चेत आला होता. मान्यता आणि संजय यांची लव्हस्टोरी देखील एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. मान्यता आणि संजय यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत.

मान्यता एका मुस्लीम कुटुंबात मोठी झाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी.. असं मान्यता हिचं स्वप्न होतं. चांगली संधी मिळेल म्हणून मान्यता हिने अनेक प्रयत्न केलं. पण मान्यताच्या मनासारखं होवू शकलं नाही. अखेर मान्यता हिने बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण मान्यताने अशा सिनेमांमध्ये काम करावं हे संजय दत्तला आवडले नाही.

जेव्हा संजय आणि मान्यता यांची भेट झाली तेव्हा मान्यता बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करत होती. पण जेव्हा संजय आणि मान्यता यांनी एकमेकांना डेट करणं सुरु केलं तेव्हा तिने सिनेमांमध्ये काम करणं सोडलं. पत्नीचं बी ग्रेड सिनेमे आवडत नसल्यामुळे संजूबाबने मान्यता हिच्या बी ग्रेड सिनेमांच्या सीडी आणि डीव्हीडी विकत घेतल्या. यासाठी संजूबाबाला मोठी किंमत मोजाली लागली.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, संसूबाबाने बी ग्रेड सिनेमाचे सर्व राईट्स विकत घेतले. यासाठी अभिनेत्याने तब्बल २० लाख रुपये मोजले होते. एवढंच नाही तर, पत्नीचे सर्व व्हिडीओ हटवण्यासाठी अभिनेत्यान सर्व प्रयत्न केले. तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता आणि संजय दत्त यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा रंगत होत्या.

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता यांनी वयाच्या ५० व्या वर्षी २००८ मध्ये लग्न केले. अगदी साध्या पद्धतीत दोघांचं लग्न झालं. आज मान्यता आणि संजय त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. संजय दत्त सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

‘मुन्ना भाई एम बी बी एस’, ‘संजू’, ‘खलनायक’, ‘शमशेरा’, ‘अग्निपथ’, ‘पीके’, ‘साजन’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून संजूबबा  चाहत्यांच्या भेटीस आला. आज संजूबाबाच्या चाजहत्यांची संख्या फार मोठी आहे आणि अभिनेत्याचे सिनेमे पाहण्यासाठी देखील सिनेमागृहात चाहत्यांची मोठी गर्दी जमते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.