माधुरी आणि करिश्माच्या डान्सने ताज्या झाल्या ‘दिल तो पागल है’ च्या आठवणी, व्हिडीओ पाहून फॅन्स फिदा

करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांना एकत्र पाहून 'दिल तो पागल है' चित्रपटाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. दोघींनी त्यांच्या अमेझिंग डान्स मूव्हजने चाहत्यांची मने जिंकली.

माधुरी आणि करिश्माच्या डान्सने ताज्या झाल्या 'दिल तो पागल है' च्या आठवणी, व्हिडीओ पाहून फॅन्स फिदा
माधुरी-करिश्माचा डान्स पाहून चाहते फिदाImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 4:21 PM

Madhuri Dixit Karishma Kapoor Dance : ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचा समावेश होतो. डान्सिंग दिवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही अभिनेत्री आजही कमालीच्या तंदुरुस्त आणि सक्रिय आहेत. करिश्मा आणि माधुरीची जोडी एकत्र दिसल्यावर पुन्हा एकदा ‘दिल तो पागल है’ चित्रपटाच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या झाल्या. या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा करिश्मा आणि माधुरीने आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे.

करिश्माने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिची डान्स पार्टनर माधुरी दीक्षितसोबत डान्स करत आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर दोन्ही अभिनेत्री जबरदस्त डान्स मूव्ह दाखवत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत करिश्माने कॅप्शन लिहिले, ‘Dance of E̶n̶v̶y̶ Friendship’ म्हणजेच मैत्रीचा डान्स

दिल को पागल है चित्रपटातील माधुरी आणि करिश्माचा एन्व्ही डान्स तुम्हाला आठवत असेलच. दोन्ही अभिनेत्रींनी वाद्यांच्या तालावर दाखवलेल्या डान्सिंग मूव्ह्स पाहून तु्म्हीसुद्धी थिरकू लागाल.

शाहरुख खानसोबतच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरलाचे कामही सर्वांना खूप आवडले होते. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.

माधुरी दीक्षित 56 वर्षांची आणि करिश्मा कपूर 48 वर्षांची आहे, पण दोघींचे सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

माधुरी दीक्षित डान्सिंग रिॲलिटी शो आणि अभिनयाच्या जगातही खूप सक्रिय आहे. काही काळापूर्वी माधुरी द फेम गेम या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

त्याचबरोबर करिश्मा कपूरही चर्चेत आहे. करिश्मा नुकतीच ओटीटी वेब सीरिज ब्राउनमध्ये दिसली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.