Love Story | पार्टीत पहिल्यांदाच झाली होती भेट, बाईक राईडपासून लग्नापर्यंत पोहोचली माधुरी-श्रीराम नेनेंची प्रेमकथा!

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या कारकिर्दीची सुरूवात राजश्रीच्या 'अबोध' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातून माधुरीने आपल्या अभिनयाची अशी छाप सोडली की, आजपर्यंत तिचे कौतुक होत आहे.

Love Story | पार्टीत पहिल्यांदाच झाली होती भेट, बाईक राईडपासून लग्नापर्यंत पोहोचली माधुरी-श्रीराम नेनेंची प्रेमकथा!
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:16 AM

मुंबई : वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या कारकिर्दीची सुरूवात राजश्रीच्या ‘अबोध’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातून माधुरीने आपल्या अभिनयाची अशी छाप सोडली की, आजपर्यंत तिचे कौतुक होत आहे. या चित्रपटानंतर माधुरीने अभ्यासासाठी थोडा वेळ दिला आणि त्यानंतर तिने पुन्हा चित्रपटात पुनरागमन केले. आजवरच्या कारकिर्दीत माधुरीने जवळपास सगळ्या मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे (Madhuri Dixit and Sriram Nene love story).

कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करणार्‍या माधुरीचे हृदय मात्र डॉ. श्रीराम नेने (Sriram Nene) यांच्यावर आले होते. माधुरी श्रीराम यांच्या प्रेमात इतकी ‘वेडी’ झाली होती की, तिने त्यांच्यासाठी सर्व काही सोडले आणि त्यांच्याबरोबर स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. चला तर, जाणून घेऊया या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली…

पार्टीमध्ये झाली माधुरी-श्रीराम यांची भेट

माधुरी आणि श्रीरामची प्रेमकथा कशी सुरू झाली, असे प्रश्न चाहत्यांना सतत पडत असतात. अशाच एका मुलाखतीत स्वत: माधुरीने तिच्या प्रेमकथेविषयी सांगितले होते. श्रीराम नेने यांच्याशी पहिली भेट कशी झाली सांगताना माधुरी म्हणाली की, त्यांची भेट हा केवळ योगायोग होता. दोघांची पहिली भेट माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये (लॉस एंजेलिस) झाली होती.

लोकप्रिय असणाऱ्या माधुरीला श्रीराम ओळखत नव्हते!

आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा माधुरी श्रीराम यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा ती एक सुपरस्टार होती. परंतु, तरीही श्रीराम नेनेंना तिच्याबद्दल माहित नव्हते. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते हे त्यांना माहित नव्हते. पण माधुरीला श्रीराम यांची साथ आवडली होती (Madhuri Dixit and Sriram Nene love story).

नेने यांची ऑफर

त्यांच्या पहिल्या भेटीनंतर दोघांची छान मैत्री झाली. यानंतर, डॉ. नेने  यांनी तिला एकदा विचारले की, तू माझ्याबरोबर डोंगरावर बाईक चालवण्यास येशील का? त्यावेळी माधुरीला वाटले की, छान आहे, तिथे पर्वत आणि बाईकसुद्धा आहेत. पण, तिथे जाणे फारच अवघड होते. येथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

यशाच्या शिखरावर असताना लग्न

जेव्हा माधुरीने अमेरिकन डॉक्टरशी लग्न केले, तेव्हा तिची कारकीर्द उंचावत होती. त्यावेळी तिच्या हातात अनेक नवे प्रकल्प होते. अशा परिस्थितीत माधुरी हवाई येथे दहा दिवसांचा हनिमून आटोपून भारतात परतली आणि सर्व प्रकल्प पूर्ण केले. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत अमेरिकेत स्थायिक झाली. बॉलिवूडला निरोप दिल्याच्या वृत्ताने माधुरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

भारतात परतली माधुरी

अमेरिकेत जवळपास 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर माधुरीने पुन्हा भारतात परतली आणि त्याच बरोबर तिने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पदार्पण केले. माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलगे आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात सेवा देत आहेत.

(Madhuri Dixit and Sriram Nene love story)

हेही वाचा :

श्रीमंतीचा एक अजब-गजब मंत्र सांगणारा चित्रपट, ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच!

हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.