सर्वात श्रीमंत क्रिकेटरसोबत माधुरी दीक्षितची ‘अधुरी प्रेम कहाणी’, मुलाचं शाही कुटुंबासोबत खास कनेक्शन

Madhuri Dixit Love Story: आज शाही कुटुंबाची सून असती माधुरी दीक्षित? शाही कुटुंबातील मुलगा आणि सर्वात श्रीमंत क्रिकेटरसोबत अभिनेत्री प्रेमसंबंध, पण अधुरी राहिली दोघांची 'लव्हस्टोरी...', माधुरी कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

सर्वात श्रीमंत क्रिकेटरसोबत माधुरी दीक्षितची 'अधुरी प्रेम कहाणी', मुलाचं शाही कुटुंबासोबत खास कनेक्शन
Madhuri Dixit
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:43 PM

Madhuri Dixit Love Story: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या 57 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. करियरच्या सुरुवातील माधुरी फक्त तिच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. अनेक सेलिब्रिटींसोबत देखील माधुरीच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. माधुरी हिचं नाव शाही कुटुंबातील मुलगा आणि सर्वात श्रीमंत क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाचं नातं फार जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत लग्न केलं. तर काहींचं मात्र ब्रेकअप झालं. ब्रेकअपच्या लिस्टमध्ये माधुरी – अजय यांचं देखी नाव आहे. 90 व्या दशकात माधुरी दीक्षित – अजय जडेजा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. दोघांना लग्न देखील करायचं होतं.

हे सुद्धा वाचा

तेव्हा अजय जडेजा भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधार होते. असंख्य मुली त्यांच्यावर फिदा होत्या. माधुरी – अजय यांची पहिली ओळख एका मॅगझीन शुट दरम्यान झाली. कालांतराने दोघांच्या पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा देखील तुफान रंगली.

सांगायचं झालं तर, अजय जडेजा शाही कुटुंबातील होते. अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा जडेजाच्या कुटुंबीयांनी त्याचं ऐकलं नाही आणि लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. कुटुंबियांनी नकार दिल्यानंतर माधुरी आणि अजय यांच्या नात्याला ब्रेक लागला. दरम्यान, जडेजा मॅच फिक्सिंगमध्ये अडकले आणि त्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली.

अजय, मोहम्मद अझरुद्दीनसोबत फिक्सिंगमध्ये अडकले, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर माधुरीच्या कुटुंबीयांनीही जडेजाकडे पाठ फिरवली. माधुरीनेही संबंध संपवले आणि अमेरिकेला गेली. अमेरिकेत माधुरी हिचं लग्न डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत झालं. तर अजय जडेजा यांचं देखील लग्न झालं.

एका रात्रीत श्रीमंत झाले जडेजा

अजय जडेजा यांना जामनगर येथील राजा घोषित करण्यात आलं. ज्यामुळे जडेजा यांच्या संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ झाली. त्यांची नेटवर्थ 250 कोटी रुपये होती. पण आता अजय जडेजा यांची संपत्ती 1455 कोटी झाली आहे. निवृत्तीनंतर जडेजा कॉमेंट्री आणि कोचिंगमधून कमाई करत होते. पण आता ते भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये अव्वल स्थानी आहेत.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.