Madhuri Dixit ला ‘त्या’ किसिंग सीनचा आजही होतो पश्चाताप; स्वतःची लाज वाटल्यानंतर घेतला मोठा निर्णय…

माधुरी दीक्षित हिला आजही 'त्या' किसिंग सीनचा होतो पश्चाताप, म्हणाली, 'इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे मला...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या किसिंग सीनच्या चर्चा...

Madhuri Dixit ला 'त्या' किसिंग सीनचा आजही होतो पश्चाताप; स्वतःची लाज वाटल्यानंतर घेतला मोठा निर्णय...
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 10:27 AM

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही… फिल्मी कुटुंबातील नसून देखील माधुरी दीक्षित हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. माधुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये जवळपास ७० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. माधुरीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने काही कौटुंबीक सिनेमांमध्ये काम केलं तर काही रोमाँटिक सिनेमांमध्ये देखील माधुरीने महत्त्वाची भूमिका साकारली. एका सिनेमात दिलेल्या किसिंग सीनचा अभिनेत्रीला आजही पश्चाताप होतो. १९९३ साली दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री यावर मोठा खुलासा केला होता.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ सिनेमात अभिनेते विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा एक किसिंग सिन होता. सीन शूट करत असतात विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. तेव्हा माधुरी फक्त आणि फक्त २० वर्षांची होती. जेव्हा विनोद खन्ना यांना स्वतःच्या चुकुची जाणीव झाली तेव्हा त्यांनी माधुरीची माफी देखील मागितली.

हे सुद्धा वाचा

शुटिंग दरम्यान विनोद खन्ना यांनी केलेल्या या कृत्यामुळे माधुरीला आजही पश्चाताप होतो. शुटिंग दरम्यान माधुरीला प्रचंड संकोचल्यासारखं वाटलं होतं. विनोद खन्ना माधुरीपेक्षा तब्बल २० वर्ष मोठे होते. म्हणून अनेकदा विचार करून विनोद खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यासाठी माधुरी तयार झाली.

‘दयावान’ सिनेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते. सिनेमातील किसिंग सीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होवू नये म्हणून अभिनेत्रीने दिग्दर्शकांकडे विनंती देखील केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. माधुरी इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे दिग्दर्शकांनी तिची एकही गोष्ट ऐकली नाही. जेव्हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या सीनमुळे अनेक चर्चा रंगल्या.

माधुरी दीक्षित हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ सिनेमानंतर अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर अभिनेत्रीने ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.