Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या मुलांचा नवीन प्रवास सुरू; सोशल मीडियावर भावूक पोस्ट व्हायरल

माधुरी दीक्षितने तिच्या मुलांसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. एरिन आणि रियान ही तिची दोन्ही मुलं एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहेत. त्यामुळे भावूक झालेल्या माधुरीने या पोस्टद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या मुलांचा नवीन प्रवास सुरू; सोशल मीडियावर भावूक पोस्ट व्हायरल
Madhuri DixitImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 8:57 AM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित दोन मुलांची आई आहे. एरिन आणि रियान अशी तिच्या दोन्ही मुलांची नावं असून त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करते. रियान आणि एरिन कधीकधी वडील श्रीराम नेने यांच्या युट्यूब चॅनलवरही झळकतात. माधुरीने नुकतीच तिच्या मुलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आपली दोन्ही मुलं कॉलेजला जाणार असल्याने माधुरी भावूक झाली आहेत. मुलांसोबतच्या खास डिनरचे फोटोसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मनमोकळेपणाने हसणारी माधुरी आणि तिची दोन मुलं पहायला मिळत आहेत.

माधुरीची पोस्ट

या फोटोच्या कॅप्शनमध्ये माधुरीने लिहिलं, ‘माझी मुलं.. तुम्ही इतक्या लवकर कॉलेजलाही जाऊ लागलात. वेळ किती लवकर निघून जाते हे कळतंच नाही. तरी मी तुमच्या या नव्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. या प्रवासातील आव्हानांना सामोरं जा आणि स्वत:ची प्रगती करा. माझं तुमच्यावर सदैव प्रेम आहे आणि मला कायम तुम्हा दोघांची खूप आठवण येईल. तुम्हा दोघांशिवाय घर आधीसारखं राहणार नाही.’

हे सुद्धा वाचा

माधुरीची दोन्ही मुलं कॉलेजमध्ये

माधुरीचा मुलगा एरिन हा सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत आहे. तर 17 वर्षीय रायनने नुकतंच अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मुलांसोबतचे फोटो पोस्ट करत भावनिक संदेश लिहिताच त्यावर नेटकऱ्यांकडून आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला.

कमेंट्सचा वर्षाव

‘मी तिथे दोन वर्षांसाठी येत आहे’, असं कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने लिहिलं. तर स्वत: दोन मुलांचा पिता असलेल्या रितेशने लिहिलं, ‘हे सर्व निव्वळ प्रेम आहे.’ टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनेही या कमेंट बॉक्समध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रीराम नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर मुलं आणि माधुरीसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये माधुरी आणि श्रीराम मिळून मुलांना काही रेसिपी शिकवताना दिसले.

2021 मध्ये जेव्हा एरिन कॉलेजमध्ये प्रवेश करणार होता, तेव्हासुद्धा माधुरीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. ‘ही वेळ इतक्या लवकर आली यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्या मोठ्या मुलाने शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे आणि तो आता कॉलेजमध्ये जाणार आहे. पक्षी घरटं सोडून उडण्यास तयार झाला आहे आणि प्रत्येक आईप्रमाणे मला त्याची काळजी वाटतेय’, अशा शब्दांत माधुरी व्यक्त झाली.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.