‘द फेम गेम’ ‘मधून माधुरीचं डिजिटल जगात पदार्पण, धमाकेदार ट्रेलर रिलीज, झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य

'द फेम गेम' ही वेबसिरीज10 फेब्रुवारीला रिलीज होईल असं माधुरीने पहिलं चाहत्यांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी त्याच्या सोशल मीाडियाच्या अकाऊंटनरती टीझर देखील शेअर केला होता.

'द फेम गेम' 'मधून माधुरीचं डिजिटल जगात पदार्पण, धमाकेदार ट्रेलर रिलीज, झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य
'द फेम गेम' वेबसिरीजचं पोस्टर
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:24 AM

मुंबई – अनेक दशकं बॉलिवूडमध्ये  (bollywood) काम केल्यानंतर आघाडी अभिनेत्री माधुरी दिक्षीतने (madhuri dixit)आता डिजीटल युगात पाऊलं ठेवले आहे. त्यामुळे त्यांची डिजीटल युगातली एन्ट्री नेमकी कशी असेल, याबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. माधुरी सध्या ‘द फेम गेम’ मध्ये दिसणार आहे. नुकताच ‘द फेम गेम’ (The Fame Game Trailer) चा ट्रेलर रिलीज झाला असून त्यांमध्ये माधुरी झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य दाखवताना दिसत आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला असून चाहत्यांना आवडल्याचे सुध्दा पाहायला मिळत आहे. नेटकर्यांनी त्यांच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिल्याने ‘द फेम गेम’ मधील माधुरीची भूमिका लोकांना चांगली पसंतीला पडेल असं वाटतं. ट्रेलर रिलीज झालाय त्यामध्ये माधुरी दिक्षित सोबत संजय कपूर (sanjay kapoor) सुध्दा आहे. माधुरीचं डिजीटल जगातलं हे पहिलं पाऊल असल्याने तिचे अनेक चाहते प्रतिक्षेत आहेत. सगळ्या कलाकारांनी अतिशय चांगला अभिनय केल्याचं समजतंय त्यामुळे लोकांच्या पसंतीला उतरेल.

10 फेब्रुवारीला रिलीज होती, पण…

‘द फेम गेम’ ही वेबसिरीज10 फेब्रुवारीला रिलीज होईल असं माधुरीने पहिलं चाहत्यांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी त्याच्या सोशल मीाडियाच्या अकाऊंटनरती टीझर देखील शेअर केला होता. त्यामध्ये माधुरीने साकारलेली अनामिका आनंद आणि तिच्या आयुष्यातील झलक पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे अनामिका नाव हे अधिक बहुचर्चित असं नाव आहे. त्यामुळे त्या नावाला एक वलय तयार झालं आहे. अनामिकाला तिच्या आयुष्यात खूप स्टारडम पाहायला मिळतं. त्यामुळे तिला स्वत:च्या आयुष्यात वेगळ असं काही जाणवतं नाही. त्यामुळे माधुरीने साकारलेली भूमिका चाहत्यांच्या किती पसंत पडते हे देखील पाहणे गरजेचं आहे. 10 फेब्रुवारीला ‘द फेम गेम’ ही वेबसिरीज रिलीज होणार होती. परंतु काही कारणांमुळे होऊ शकली नाही.

नेटफ्लिक्सला ही वेबसिरीज 25 फेब्रुवारीला रिलीज होणार

नेटफ्लिक्सला ही वेबसिरीज 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे या वेबसिरीजमध्ये काय पाहायला मिळेल अशी उत्सुकता अनेकांना आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला एका कुटुंबातलं भांडण दाखवण्यात येणार आहे. अभिनेता मानव कौल, संजय कपूर, लक्षवीर सरन,मुस्कान जाफरी आणि माधुरी दिक्षित या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेकांनी आपला दमदार अभिनय या वेबसिरीजमध्ये केल्याचे समजते. परंतु वेबरसिरीज रिलीज झाल्यानंतर लोकांच्या पसंतीला किती पडते आपल्याला लवकरचं समजेल.

ढोलकीचा आवाजाने घायाळ करणारा चंद्रमुखी चित्रपट लवकरचं तुमच्या भेटीला, अजय अतुलचं दमदार संगीत

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.