मुंबई : हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi) महाराणी या वेबसिरीजचा (Maharani Season 2 Trailer) पहिला सिझन हा तुफान गाजला होता. आता हुमा कुरेशी पुन्हा एकदा ओटीटीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हुमाच्या ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या (Maharani Webseries) सीझन 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळेस राणी भारती जबरदस्त कमबॅक करणार आहे. हे ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. या भागातही ती तुम्हाला राजकारणाच्या वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसणार आहेत. तर सिरीजमध्ये नवीन कुमार अजूनही बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे विरोधक हात धुवून राणी भारतीच्या मागे पडले असल्याचे दाखवले आहे. यावेळी राणी आपल्या पतीसोबतही संघर्ष करणार आहे. अशा स्थितीत चारही बाजूंनी घेरलेली राणी भारती या परिस्थितून कसा मार्ग काढतेय? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीलाच जातीच्या आधारावर होणार्या भेदभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासाठी अनेकजण एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. यादरम्यान एका मुलाने स्वतःला पेटवून घेतल्याचा थरारक सीनही दाखवण्यात आलाय. वर्मा आयोगाच्या विरोधात जाण्यासाठी मी काहीही करू शकतो, असा जबरदस्त डायलॉग हा मुलगा मारत पेटवून घेतना ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. दुसरीकडे मिस पाटणा स्पर्धेची विजेती मिस शिल्पा अग्रवालची हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण बिहार हादरला आहे. याचा फायदा घेत विरोधकांनी राणी भारतीला घेरण्याची तयारी चालवली आहे, असाही काहीसा भाग दाखवला आहे.
एकूणच जनतेत रोष, प्रशासन गप्प, अशा संकटात राणी भारतीला दाखवण्या आलं आहे. नवीन कुमार गेल्या 17 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ही संधी तो हातातून जाऊ द्यायचा नाही. यासाठी ते धर्माची मदत घेताना दिसतील, असाही अंदाज सध्या ट्रेलर बघून बांधला जात आहे. तर दुसरीकडे राणी भारती मागे हटणाऱ्यांपैकी नाही. परंपरा मोडण्यासाठी बनवली जाते आणि ती मोडण्यासाठी स्वतः राणी कुप्रसिद्ध असल्याचा हुमाचा जबरदस्त डायलॉगही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय.
‘महाराणी सीझन 2’ आधीपेक्षाही मजबूत कथा आणि अभिनयासह परतेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना लागली आहे. दिग्दर्शक रवींद्र गौतम यांची ही वेब सिरीज 24 ऑगस्टला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विनीत कुमारसोबत हुमा कुरेशी, सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक आणि इतर कलाकार दिसणार आहेत.