‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर, कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे ठरवण्यासाठी प्रेक्षक तीन पद्धतीने त्यांचं मत नोंदवू शकतात; यामध्ये 77 99947231 ते 37 या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमचे मत देऊ शकता किंवा 99660 21 900 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास थेट व्हाट्सअप वर तुम्हाला वोटिंग डिटेल्स मिळतील. तसेच mfkzee talkies.zee5.com या वेबसाईटवरही वोटिंग सुविधा उपलब्ध आहे.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' पुरस्कारासाठी नामांकनं  जाहीर, कोण मारणार बाजी?
Maharashtracha Favourite Kon awardsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 11:45 AM

मुंबई : 9 जानेवारी 2024 | नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यापूर्वी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये नामांकन यादीत कोणी बाजी मारली हे निश्चित झाले आहे . झी टॉकीज वाहिनीवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे .

मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा आणि कलेचा कस लावून रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी कलाकारही वाट पाहत असतात. त्यांच्या कलेला दाद देणारा आणि रसिकमनाची पावती देणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार रसिकांच्या पसंतीतून निवडला जातो. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली. या जाहीर झालेल्या नावांमधून रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे. यासाठी प्रेक्षक आपली मतं नोंदवू शकतात. त्यासाठी झी 5 च्या mfkzee talkies.zee5.com वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला वोट करू शकतात.

हे सुद्धा वाचा

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट , फेवरेट दिग्दर्शक , फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री , फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक , फेवरेट लोकप्रिय चेहरा , फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक , फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी वेड, बाईपण भारी देवा, सुभेदार ,महाराष्ट्र शाहीर ,वाळवी, नाळ २, झिम्मा २ , घर बंदूक बिरयानी या चित्रपटांनी नाव कोरली आहेत. त्यामुळे प्रेक्षक पसंतीचा कौल यंदा कोणत्या सिनेमाला मिळतो आणि महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट कोणता ठरतो, हे लवकरच समजणार आहे .

View this post on Instagram

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

झी टॉकीज या लोकप्रिय वाहिनीच्या पुढाकाराने दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ हा पुरस्कार सोहळा रंगतो. प्रेक्षकच नव्हे तर सिनेमा क्षेत्रातील कलाकारही या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या लाडक्या कलाकारांना भरभरून पसंती देण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांनाही मिळत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार प्रेक्षकांच्या पसंतीतूनच निवडला जात असल्यामुळे कलाकारांसाठी देखील या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे.

‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे , दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी सुधाकर रेड्डी यक्कंटी, हेमंत ढोमे , हेमंत अवताडे यांची वर्णी लागली आहे. ‘फेवरेट अभिनेता’ या विभागातील नामांकनासाठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांची नावे असून ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम तसेच ‘वेड’ चित्रपटासाठी जिनिलिया देशमुख, ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि ‘वाळवी’ साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.