“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या गौरव मोरेनं सांगितला संघर्ष

कोणताही गॉडफादर नसताना, कुटुंबीयांकडून कोणतीही साथ मिळाली नसतानाही गौरव मोरेनं कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या आयुष्यातील संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सुरुवातीला त्याच्याकडे प्रवासासाठीही पैसै नसायचे.

तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..; हास्यजत्रेच्या गौरव मोरेनं सांगितला संघर्ष
Gaurav MoreImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 12:56 PM

मुंबई : 30 डिसेंबर 2023 | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीरांना राज्यभरात प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. त्यापैकीच एक नाव म्हणजे गौरव मोरे. हा कार्यक्रम गौरवच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो संघर्षाचे दिवस, आर्थिक समस्या, संजू या बॉलिवूड चित्रपटातील त्याची भूमिका अशा विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाला. मनोरंजनक्षेत्रात काम करण्याचा हा प्रवास कधीच सरळ नव्हता, असं त्याने सांगितलं. “माझी टिपिकल ऑनस्क्रीन हिरोसारखी पर्सनॅलिटी नाही. पण सिनेमा आणि कॉमेडीसाठीचं माझं प्रेम ओळखून मी हिरोच्या भूमिकेत काम न करताही वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न केला”, असं तो म्हणाला.

करिअरच्या सुरुवातील गौरवला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी 100 रुपयांत सर्व खर्च भागवायचो. प्रवास किंवा ऑडिशन्सला जाण्यासाठीचा खर्च मला परवडायचा नाही. मला सुरुवातीला फोनसुद्धा माहीत नव्हता. बऱ्याच काळानंतर मी की-पॅडवाला फोन खरेदी केला होता. मुंबईतल्या पवई फिल्टरपाडा या झोपडपट्टीत मी लहानाचा मोठा झालो. वस्तूंचं मूल्य काय असतं, हे मला तिथे राहून योग्यरित्या समजलं होतं. आता तिथल्या लोकांना माझ्यामुळे एक ओळख मिळाल्याचं ते सांगतात. अशा ठिकाणी मी वाढलो, याचा मला अभिमान आहे. कधीकधी प्रसिद्धी तुम्हाला तुमचं मूळ विसरायला लावते. पण मी ते कधीच विसरणार नाही. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी कुठे जन्माला आलो आणि लहानाचा मोठा झालो, हे कधीच विसरणार नाही.”

हे सुद्धा वाचा

गौरवला सुरुवातीला कुटुंबीयांकडून साथ मिळाली नाही. “या क्षेत्रात काम करण्यासाठी संयम लागतो. इथे रातोरात तुम्हाला पैसा कमावता येत नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांनी माझी साथ दिली नव्हती. पण त्यांच्या स्थानी ते बरोबर होते. आपल्या मुलाने चांगला पैसा कमवावा, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. माझ्या संघर्षाच्या दिवसात मी एक रुपयाही कमावत नव्हतो. तरीही माझ्या आईवडिलांनी मला ते सर्व दिलं, जे त्यांना शक्य होतं. पण आमची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, म्हणून सर्वसामान्य गरजांपेक्षा वेगळं काही मी त्यांच्याकडे मागू शकलो नाही.”

गौरवने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला होता. पण अभिनय आणि कॉमेडीत फारसा अनुभव नसल्याने पुढे जाऊ शकलं नसल्याचं त्याने म्हटलं. अनेकदा तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप परफॉर्म करायचा. “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मला सर्वकाही दिलं. पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य या गोष्टी मला शोने दिल्या. सध्या मी सर्वांत महागड्या मोबाइल फोनपैकी एक वापरतो. दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. आता माझ्याकडे कार आणि बाईक आहे. त्यावेळी माझ्याकडे शूज नव्हते. पण आता शूजचं कलेक्शन आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. पण आता तेच माझ्या घरी येतात आणि माझ्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करतात,” असं त्याने अभिमानाने सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.