AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकानेच देऊ केली नोकरी, वाचा दीपक हुलसुरेची संघर्ष कथा…

प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या अशोक खाडे यांनी दीपकला आपल्या कंपनीत ‘चीफ सिक्युरिटी ऑफिसर’ ही पोस्ट देऊ केली आहे. इतकेच नाही तर, यासाठी काही भन्नाट अटी देखील त्यांनी ठेवल्या आहेत.

‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकानेच देऊ केली नोकरी, वाचा दीपक हुलसुरेची संघर्ष कथा...
अशोक खाडे आणि दीपक हुलसुरे
| Updated on: Mar 16, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : सोनी टिव्ही मराठीवर सुरु असलेल्या डान्स शो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रथमेश मानेने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, या भागात अधिक चर्चेत आला तो लातूरचा स्पर्धक दीपक हुलसुरे (Deepak Hulsure). अतिसामान्य कुटुंबातून आपल्या कलेच्या जोरावर पुढे आलेल्या दीपकचा ‘या’ मंचापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आणि कठीण होता. मात्र, याच मंचावर त्याला त्याच्या एका चाहत्याने चक्क मोठं सरप्राईज दिलं (Maharashtras Best Dancer Deepak Hulsure life story one of his fan gave him a good job offer on stage).

महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या दीपकच्या एका चाहत्याने त्याला स्वतःच्या कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी देऊ केली आहे. प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या अशोक खाडे यांनी दीपकला आपल्या कंपनीत ‘चीफ सिक्युरिटी ऑफिसर’ ही पोस्ट देऊ केली आहे. इतकेच नाही तर, यासाठी काही भन्नाट अटी देखील त्यांनी ठेवल्या आहेत.

कोण आहे दीपक हुलसुरे?

लातूरच्या जगलपूर भागात एका गरीब कुटुंबात दीपकचा जन्म झाला. पहिल्यापासूनच त्याला नृत्याची आणि स्टंट करण्याची आवड होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नृत्याचे शिक्षण घेता आले नाही. मात्र, पुढे लातूर शहरामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्याने अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये बाग घेऊन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. अशाच एका कार्यक्रमात त्याने एका मुलाला बॅक फ्लिप मारताना पहिले आणि घरी आल्यानंतर त्याने शेतीची कामं करता करता ही फ्लिप शिकण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याला बरीच दुखापतही झाली. मात्र, पठ्ठ्याने त्याची जिद्द पूर्ण केली.

घरात सुरुवातीपासून टीव्ही नव्हताच, त्यामुळे असे कोणतेही कार्यक्रम त्याला बघता यायचे नाहीत. मात्र, महाविद्यालयात गेल्यावर वडिलांनी त्याला एक मोबाईल घेऊन दिला. दीपक त्याच्यावर व्हिडीओ पाहून नृत्य शिकू लागला. घरची जबाबदारी सांभाळत त्याने आपली कला देखील जोपासण्यास सुरुवात केली. याच कलेच्या आधारावर दोन पैशे देखील त्याला मिळू लागले. पुढे त्याने अशा नृत्यावर आधारित कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या माध्यमातून तो आणि त्याची ही संघर्ष कथा घराघरांत पोहचली (Maharashtras Best Dancer Deepak Hulsure life story one of his fan gave him a good job offer on stage).

अशोक खाडे म्हणतात, नोकरी देतो पण एकच अट…

कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेले अशोक खाडे म्हणाले, ‘मी माझगाव डॉकमध्ये 15 वर्षे नोकरी केली. या काळात एकदा मी जर्मनीला गेलो. तिथून पुन्हा आल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. जेव्हा दीपकला मंचावर पाहिलं तेव्हा असं वाटलं की, ही माझी तर माझ्याचसारखी गरिबी आहे. म्हणून आता मी असं ठरवलंय की, दीपकला मी माझ्या कंपनीत नोकरी देणार.’

पुढे ते म्हणतात, ‘दीपक माझ्या कंपनीत चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करेल. त्याच्या पगारातील 15 हजार रुपये मी त्याच्या आई-वडिलांना पाठवणार, 10 हजार त्याला स्वतःच्या खर्चाला देणार. या दरम्यान त्याने मनसोक्त त्याची कला जपावी, बाहेरगावी जाऊन शो करावे. त्याला लागतील तितके पैसे मी द्यायला तयार आहे. पण यासाठी अट एकच की, दीपकने महिन्यातून किमान चार दिवस कंपनीत येऊन माझ्यासोबत चहा प्यायचा!’ अशोक खाडे यांचे बोलणे ऐकून दीपकसहीत मंचावर उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.

(Maharashtras Best Dancer Deepak Hulsure life story one of his fan gave him a good job offer on stage)

हेही वाचा :

The Big Bull Teaser | शेअर मार्केटची झलक दाखवणारा ‘द बिग बुल’चा जबरदस्त टीझर, पाहा अभिषेक बच्चनचा नवा लूक…

आधी हातावर नावं गोंदवली, आता मात्र एकमेकांसोबत दिसणंही कठीण! शिव-वीणाच्या नात्यात ‘का रे दुरावा’?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.