Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरात महेश भट्ट यांनी मनीषा राणीला केलं किस; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

सोशल मीडियावरील आणखी एका व्हिडीओमध्ये महेश भट्ट हे मनीषाच्या एकदम जवळ जाऊन बसतात आणि तिचा हात आपल्या हातात घेतात. पूजा भट्ट त्यांच्यासमोर मनीषाचं कौतुक करत असते आणि तिचे काही किस्से सांगते. हे सर्व ऐकत असतानाही महेश भट्ट यांच्या हातात मनीषाचा हात असतो.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या घरात महेश भट्ट यांनी मनीषा राणीला केलं किस; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Mahesh BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 9:13 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. या शोची सर्वांत लोकप्रिय स्पर्धक पूजा भट्टचे वडील महेश भट्ट तिला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. मात्र घरात एण्ट्री करताच मनीषा राणीने त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर महेश भट्ट यांनी तिला ज्याप्रकारे पाहिलं आणि तिला जी वागणूक दिली, त्यावरून सध्या नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत. महेश भट्ट ज्याप्रकारे मनीषा राणीला पाहत होते, तिला स्पर्श करत होते आणि किस करत होते, ते सर्व पाहून चाहते सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. महेश भट्ट यांना नेटकरी ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये महेश भट्ट हे मनीषा राणीला किस करतात आणि तिचा हात हातात घेतात. महेश भट्ट यांनी घरात प्रवेश करताच मनीषा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली तेव्हा महेश भट्ट यांनी तिला रोखलं आणि स्वत: तिच्या पाया पडू लागले. त्यानंतर दोघं बराच वेळ एकमेकांकडे पाहताना दिसले. बिग बॉसच्या घरात सतत बडबड करणारी मनीषा त्यांच्यासमोर गप्पच झाली. महेश भट्ट तिला म्हणाले की माझ्या डोळ्यांमध्ये बघ आणि दोघांच्या नजरेचा खेळ सुरू झाला. पूजा भट्ट आणि घरातील इतर स्पर्धक हे सर्व पाहत होते.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील आणखी एका व्हिडीओमध्ये महेश भट्ट हे मनीषाच्या एकदम जवळ जाऊन बसतात आणि तिचा हात आपल्या हातात घेतात. पूजा भट्ट त्यांच्यासमोर मनीषाचं कौतुक करत असते आणि तिचे काही किस्से सांगते. हे सर्व ऐकत असतानाही महेश भट्ट यांच्या हातात मनीषाचा हात असतो. त्यानंतर ते तिच्या हातावर किस करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महेश भट्ट यांना त्यांच्या वागणुकीबद्दल बरंच ट्रोल केलं जात आहे. याआधीही महेश भट्ट हे अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबतच्या जवळीकमुळे चर्चेत आले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.