नितीन देसाई यांच्यासोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकर यांच्याकडून मोठी माहिती उघड

'... असा नितीन देसाई होणे नाही..', शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा; महेश मांजरेकर यांच्याकडून मोठी माहिती समोर..., नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ

नितीन देसाई यांच्यासोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकर यांच्याकडून मोठी माहिती उघड
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 11:06 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : दिग्गज कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी पोहोले असून अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. प्रथम मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या निधनामागचं कारण समजू शकेल. अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, पोलिसांचा तपास सुरु आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठी माहिती उघड केली आहे. ‘अत्यंत वाईट बातमी आहे. मराठी सिनेमासाठी नितीन देसाई गर्व होते. कलादिग्दर्शकापेक्षा जास्त ते माझे मित्र होते. मी प्रचंड दुःखी आहे. काय बोलावं कळत नाही. माणसाच्या डोक्यात काय सुरु आहे ते आपल्याला कळत नाही… आपल्यालानंतर कळतं आपण बोलायला हवं होतं का? आपण कधी बोलत नाही मित्र म्हणून भेटत नाही. कलादिग्दर्शक म्हणून ते बेस्ट होतेच.’

पुढे मांजरेकर म्हणाले, ‘नितीन देसाई यांनी एक दर्जा निर्माण केला होता. हे मराठी कलाविश्वाचं मोठं नुकसान आहे. दोन – तीन महिन्यांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. आम्ही बोल्लो तेव्हा मला ते अगदी शांत झाल्यासारखे वाटले. मराठी माणूस आला की स्टुडीओच्या रेटसाठी आधी ते बजेट विचारायचे. मी ‘शिवाजी राजे भोसले’ त्यांच्या स्टुडिओमध्ये शूट केला. तेव्हा ते मला म्हणाले, तुझा बजेट असेल तेवढे दे. मित्रासाठी नितिन देसाई कायम मदतीसाठी पुढे असायचे.. असा नितीन देसाई होणे नाही..’ असं देखील महेश मांजरेकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २० वर्षांपेक्षा अधिक काळ नितीन देसाई यांनी कलाविश्वात काम केलं आहे. अशात त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.