घराणेशाहीच्या टीकांवर महेश मांजरेकरांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली..

"घराणेशाहीवरून मला कोणी काही म्हणत असेल तर.."; सई मांजरेकरने टीकांवर सोडलं मौन

घराणेशाहीच्या टीकांवर महेश मांजरेकरांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली..
Mahesh Manjrekar, Saiee Manjrekar Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 9:19 AM

मुंबई: दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमान खानच्या ‘दबंग 3’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने तेलुगू चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला. ‘मेजर’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. इंडस्ट्रीत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सई प्रयत्न करतेय. मात्र यादरम्यान तिला घराणेशाहीच्या टीकांचा सामना करावा लागतोय. या टीकांवर पहिल्यांदाच सईने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सई म्हणाली, “तुला घराणेशाहीचा फायदा मिळतो, असं जर कोणी मला म्हणत असेल, तर प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मी ते मान्य करेन. घराणेशाहीमुळे जो विशेषाधिकार म्हणतो, त्याला मी नाकारणारी नाही. मी ते मान्य करते आणि त्याचा स्वीकारही करते. पण तरीसुद्धा मी त्यातून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन.”

हे सुद्धा वाचा

इंडस्ट्रीतील घराणेशाहीबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “इथं ते आहेच. इतरांपेक्षा थोड्या सहजतेने मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण त्यासाठी मी कृतज्ञ आहे. आज मी ज्याठिकाणी आहे, तिथे पोहोचण्यासाठी एखादी व्यक्ती दहा पटींनी जास्त मेहनत करत असेल. त्यामुळे मिळालेली जागा टिकवून ठेवण्यासाठी मलाही दहा पटींनी जास्त मेहनत करावी लागेल.”

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींविषयी काही ठराविक धारणा असल्याचंही तिने सांगितलं. “दबंग 3 प्रदर्शित होण्यापूर्वी मी काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये गेली होती. जेव्हा सर्वजण जेवायला बसायचे, तेव्हा अनेकांनी हे आधीच गृहीत धरलेलं असतं की मी डाएटिंग करतेय. तू खाणार आहेस की डाएटिंग करतेय, असाच प्रश्न ते विचारायचे. अभिनेत्री नेहमीच डाएट करतात, असा अनेकांचा समज असतो”, असं सई म्हणाली.

“ज्या लोकांना मी आधीपासून ओळखते, त्यांना आता असं वाटतं की मी अहंकारी होईन आणि सर्व गोष्टी बदलतील. हा गैरसमज लोकांच्या डोक्यातून काढणं कठीण आहे,” अशी खंत तिने बोलून दाखवली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.