‘छावा’ आणि विकीबद्दल महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत; म्हणाले, ‘…तर त्या दिवशी विकी कौशल संपेल’
'...तर त्या दिवशी विकी कौशल संपेल', विकी कौशलबद्दल असं का म्हणाले महेश मांजरेकर, 'छावा' सिनेमाबद्दल देखील केलं मोठं वक्तव्य, 2025 मधील 'छावा' सिनेमात सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. सर्वत्र सिनेमाने विक्रम रचले आहेत...

Mahesh Manjrekar on Vicky Kaushal and Chhaava: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, जगभरात नवे विक्रम रचले आहेत. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली. चित्रपटगृहात प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने जवळपास 800 कोटींची कमाई केली. सिनेमात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली. तर अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाच्या भूमिकेला न्याय दिला.
‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलच, पण विकी कौशल याच्या अभिनयाचं देखील सर्वच स्तरातून कौतुक झालं. अनेकांनी अभिनेत्याचं कौतुक केलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘छावा’ आणि विकी कौशल यांच्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
‘छावा’ सिनेमाच्या यशाचं श्रेय माझ्या महाराष्ट्राला जातं तर, ज्या विकी कौशलला असं वाटेल की तो प्रेक्षक घेवून येत आहे, त्यावेळी विकी संपेल… असं वक्तव्य देखील महेश मांजरेकर यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र महेश मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.




महेश मांजरेकर म्हणाले, ‘हिंदी सिनेमांची आज जी परिस्थिती आहे ती फारच दारुण आहे. माझ्या महाराष्ट्राने हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे. आज ‘छावा’ सिनेमाने उत्तर कामगिरी केली आहे. त्यापैकी 80 टक्के श्रेय हे महाराष्ट्राला जात आणि त्यातील 90 टक्के श्रेय हे पुण्याला जात आहे… त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्री तारु शकतो… गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सिनेमे फेल ठरले. त्यातल्या त्यात ‘लापता लेडीज’ सिनेमा बऱ्यापैकी चालला… त्यामुळे वर्चस्ववादी कलाकारांना कळू लागलं आहे की, ते आता कमाईचे आकडे गाठू शकत नाहीत….’
अभिनेता विकी कौशल याच्याबद्दल देखील महेश मांजरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘विकी कौशल फारच उत्तम अभिनेता आहे. त्याच्या ‘छावा’ सिनेमाने 800 कोटींची कमाई केली आहे. पण त्याने असं कधीच समजू नये की प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहात आले आहेत. प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी नाही तर, त्याने साकारलेल्या भूमिकेला पाहण्यासाठी आले आहेत. जर प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी आले असते तर विकीचे आधीच पाच सिनेमे देखील हीट ठरले असते… अभिनेता म्हणून विकी उत्तमच आहे. पण ज्यावेळी अभिनेत्याला असं वाटतं की तो प्रेक्षक घेवून येत आहे, त्यावेळी अभिनेता संपतो…’ असं देखील महेश मांजरेकर विकी कौशल याच्याबद्दल म्हणाले.
महेश मांजरेकर यांचा ‘देवमाणूस’ सिनेमा
महेश मांजरेकर यांचा ‘देवमाणूस’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिनेमात महेश मांजरेकर यांच्यासोबत अभिनेते सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिनेत्री रेणुरा शहाणे देखील मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ‘देवमाणूस’ सिनेमाची चर्चा देखील सर्वत्र सुरु आहे.