पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?

फोटोमध्ये मी इतकी खुश का दिसतेय, पण 90 टक्के कारण म्हणजे माझी आई मला पाहून ससा तो ससा, की कापूस जसा' गात होती.' असं कॅप्शन तिने दिलंय (Marathi Actress Rasika Sunil childhood photo)

पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड 'व्हिलन' ओळखलीत?
अभिनेत्री रसिका सुनीलचा बालपणीचा फोटो
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 10:54 AM

मुंबई : बालदिन किंवा सोशल मीडियावरील ट्रेण्डमुळे अनेक जण आपले लहानपणीचे फोटो शेअर करत असतात. मात्र मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या एका ‘व्हिलन’ने नुकताच आपला बालपणीचा गोड फोटो शेअर केला आहे. बाबांच्या मांडीवर बसलेली ही गोबऱ्या गालांची ‘पापा की परी’ दुसरी-तिसरी कोण नाही, तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत आधी राधिका, आणि नंतर गॅरीला जेरीस आणणारी शनाया आहे. (Majhya Navaryachi Bayko fame Marathi TV Actress Rasika Sunil Shares childhood photo with Father)

प्रख्यात अभिनेत्री रसिका सुनील हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ‘खजिना… चिमुकली मी आणि बाबा. कधीच न दाखवलेला फोटो. मला माहित नाही, फोटोमध्ये मी इतकी खुश का दिसतेय, पण 90 टक्के कारण म्हणजे माझी आई मला पाहून ससा तो ससा, की कापूस जसा’ गात होती.’ असं कॅप्शन रसिकाने फोटोला दिलंय.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रसिका सुनिलला ओळखले जाते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये साकारलेल्या शनायाच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

रसिकानं ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील नखखट शनाया साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण दोन वर्षांपूर्वी फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी तिने मालिका सोडली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. (Majhya Navaryachi Bayko fame Marathi TV Actress Rasika Sunil Shares childhood photo with Father)

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाने काही दिवसांपूर्वी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हॅशटॅगवरुन हा व्हिडीओ लॉस अँजेलेसमधील असल्याचं दिसतं. हे प्रशिक्षण रसिकाने अमेरिकेत गेली असताना घेतलं असावं.

दरम्यानच्या काळात अभिनेत्री ईशा केसकरने मालिकेत शनायाची भूमिका साकारली. ईशानेही या भूमिकेत जान ओतली होती. परंतु चाहते रसिकाला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी आतुर झाले होते.

लॉकडाऊनच्या काळात मालिकांची चित्रिकरणं बंद असल्यामुळे ब्रेक लागला होता. याच काळात रसिकाही मुंबईला परतली. त्यामुळे लॉकडाऊननंतर जुलै 2020 मध्ये जेव्हा सिरीअल्स पुन्हा रुजू झाल्या, तेव्हा रसिका सुनील पुन्हा शनायाच्या भूमिकेत परतली. मात्र आठ मार्चला माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

संबंधित बातम्या : 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सौमित्रची आई आहे सचिन पिळगावकरांसोबत गाजलेली अभिनेत्री

(Majhya Navaryachi Bayko fame Marathi TV Actress Rasika Sunil Shares childhood photo with Father)

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.