Malaika Arora | ‘मुलाचा तरी थोडा विचार कर’; अर्जुनचा सेमी न्यूड फोटो पोस्ट केल्याने मलायकावर भडकले नेटकरी

मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Malaika Arora | 'मुलाचा तरी थोडा विचार कर'; अर्जुनचा सेमी न्यूड फोटो पोस्ट केल्याने मलायकावर भडकले नेटकरी
Arjun Kapoor and Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 7:46 AM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. सोशल मीडिया असो, एखादा कार्यक्रम असो, बॉलिवूड पार्ट्या असो किंवा मग डिनर डेट.. अर्जुन आणि मलायका खुलेपणाने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी ही एक जोडी आहे. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनचा फोटो पोस्ट केला. हा फोटो क्षणार्धात व्हायरल झाला आहे. मलायकाने पोस्ट केलेला अर्जुनचा हा फोटो सेमी-न्यूड असल्याने नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. अनेकांनी या फोटोवरून मलायकाला ट्रोल केलं आहे.

‘माझा आळशी मुलगा’, असं कॅप्शन देत मलायकाने अर्जुनचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अर्जुन सेमी-न्यूड अवतारात पहायला मिळत आहे. या फोटोसोबतच मलायकाने if you know you know असा हॅशटॅग वापरला आहे, ज्यावरून तिने अर्जुनसोबतच्या खासगी क्षणांचा उल्लेख केल्याचं स्पष्ट होतंय. मलायकाचा हा अंदाज नेटकऱ्यांना अजिबात पसंत पडला नाही. अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

पहा फोटो

हे सुद्धा वाचा

‘प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मला त्या दोघांमधील वयाच्या अंतराने फरक पडत नाही. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेमाची गरज असते. पण मलायका ही एका किशोरवयीन मुलाची आई आणि ती सोशल मीडियावर अशी वागतेय हे पाहून वाईट वाटतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘किमान मुलाचा तरी विचार कर. त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्याला किती ट्रोल केलं जाईल, याचा जरासुद्धा विचार आला नाही का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘सोशल मीडियावर असे फोटो का पोस्ट करावेत’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघांनी जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाबाबत चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मलायका लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी लग्नाबद्दल नक्कीच विचार केला आहे. लोकांना असं वाटत असेल की मी पुन्हा लग्न करण्याबाबत नकारात्मक असेन, पण हे खरं नाहीये. मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तितकाच मला प्रेमावरही विश्वास आहे. मी पुन्हा लग्न कधी करेन हे मी सांगू शकत नाही, कारण एखाद्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सरप्राइज म्हणून राहिलेल्याच बऱ्या असतात. मला सतत प्लॅनिंग करायलाही आवडत नाही”, असं ती म्हणाली होती.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.