Malaika Arora: ..तर मग मलायका अर्जुन कपूरशी करणार नाही लग्न? ‘फ्युचर प्लॅन्स’बद्दल म्हणाली..

अर्जुन कपूरसोबतच्या नात्याचं भविष्य काय? अखेर मलायकाने उत्तर दिलंच!

Malaika Arora: ..तर मग मलायका अर्जुन कपूरशी करणार नाही लग्न? 'फ्युचर प्लॅन्स'बद्दल म्हणाली..
Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 2:49 PM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला. या एपिसोडमध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या. अरबाज खानला घटस्फोट का दिला, नेमकं कुठे बिनसलं होतं याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली. याचसोबत अर्जुन कपूरसोबतच्या नात्याचं भविष्य काय, याचंही उत्तर तिने दिलं,

काय म्हणाली मलायका?

अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल ज्या काही टीका झाल्या, त्यांचा सामना कसा केला असा प्रश्न फराह खानने मलायकाला विचारला. “मी स्वत: माझ्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं. त्यावेळी मलाही प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. आता तुलाही या टीका ऐकायला मिळतात. त्यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे”, असा प्रश्न फराहने विचारला.

“हे सोपं नव्हतं. मी दररोज कोणत्या ना कोणत्या टीकांचा सामना करते. जेव्हा एखादा पुरुष त्याच्यापेक्षा 20 किंवा 30 वर्षांनी लहान महिलेला डेट करतो, तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. तो या जगाचा राजा आहे, असंच त्याला दाखवून दिलं जातं. मात्र हीच गोष्ट एखाद्या महिलेनं केली तर त्यांना आई-लेकाची जोडी म्हणून हिणवलं जातं. हे दररोज होतंय. यापैकी बऱ्याच गोष्टी या बाहेरच्यांनी नाही तर माझ्या घरच्यांनीच म्हटल्या आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींकडून असं काही ऐकायला मिळालं तर आणखी वाईट वाटतं”, अशा शब्दांत मलायकाने नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

काय आहेत मलायकाचे ‘फ्युचर प्लॅन्स’?

“तुझे भविष्यात काही प्लॅन्स असतीलच ना. तुला मुलं हवी आहेत का? किंवा दुसरं लग्न करणार आहेस का”, असा थेट सवाल फराहने मलायकाला केला. याचं उत्तर देताना मलायका म्हणाली, “हे पहा, या सर्व चर्चा काल्पनिक आहेत. अर्थातच आम्ही याविषयी एकमेकांशी बोललोय. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अशा गोष्टींविषयी चर्चा करताच. मला असं वाटतं की मी एका रिलेशनशिपमध्ये चांगली व्यक्ती आहे. मी आज जे काही निर्णय घेतले ते यासाठी कारण मला खुश राहायचं होतं. आज माझ्या आयुष्यात जी व्यक्ती आहे, ती मला खुश ठेवते. त्याबद्दल जग काय म्हणतंय त्याने मला फरक पडत नाही.”

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.