Malaika Arora: मुलानेच उडवली मलायका अरोराच्या कपड्यांची खिल्ली; म्हणाला “जेलमधल्या कैदीसारखं..”

मलायकाला मुलानेच केलं ट्रोल; ड्रेसिंग सेन्सबद्दल केली अशी कमेंट, वाचून तुम्हालाही येईल हसू!

Malaika Arora: मुलानेच उडवली मलायका अरोराच्या कपड्यांची खिल्ली; म्हणाला जेलमधल्या कैदीसारखं..
मलायका अरोरा, अरहान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 9:31 AM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेत असते. वयाची पंचेचाळिशी ओलांडल्यानंतरही मलायका मॉडेलिंगच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकते. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात मुलानेच तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली आहे. ‘मूव्हींग इन विथ मलायका’ या शोमध्ये अरहान खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आईच्या स्टायलिश कपड्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

मूव्हींग इन विथ मलायका या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मलायकाने ग्लॅमरस टॉप परिधान केला होता. मात्र याच टॉपवरून अरहानने तिची मस्करी केली. अरहानने त्याच्या आईच्या आऊटफिटची तुलना टेबल नॅपकिनशी केली. “तू जेलमधल्या कैदीसारखी दिसतेयस”, असं तो म्हणाला. हे ऐकून मलायकालाही हसू अनावर झालं.

हे सुद्धा वाचा

या शोमध्ये अरहानने मावशी अमृता अरोरासोबतच्या नात्याबद्दलही वक्तव्य केलं. “मी अमूच्या (अमृता अरोरा) बाजूने आहे. कारण ती तुझी (मलायका) जागा घेण्यासाठी स्वत: खूप प्रयत्न करत असते. माझ्यासाठी ती दुसऱ्या आईसारखीच आहे. मात्र मला असं वाटतंय की ती आता पहिल्या स्थानावर येतेय”, असं तो म्हणतो.

मावशी अमृता अरोरासोबत अरहानचं खूप खास नातं आहे. मलायका आणि अमृता या दोन्ही बहिणींमध्येही खूप मैत्रीपूर्ण नातं आहे. मलायकाच्या प्रत्येक चढउतारांमध्ये तिने साथ दिली.

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतोय. विमानतळावर त्याला सोडायला जाताना किंवा तो परतल्यावर त्याला आणायला जाताना नेहमीच मलायका आणि अरबाजला एकत्र पाहिलं जातं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.