पूर्व पत्नीकडून छळाच्या आरोपानंतर प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; ड्राइव्हरनेही केली पोलखोल

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला आणि त्याचा मॅनेजर राजेश यांना पोलिसांनी अटक केली आहे. बालाची पूर्व पत्नी अमृता सुरेशकडून त्याच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर बालाच्या ड्राइव्हरनेही त्याच्यावर काही आरोप केले आहेत.

पूर्व पत्नीकडून छळाच्या आरोपानंतर प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; ड्राइव्हरनेही केली पोलखोल
मल्याळम अभिनेता बाला आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सुभाषImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 2:59 PM

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता बाला याला आज (14 ऑक्टोबर) आज सकाळी पोलिसांनी अटक केली. बालाची पूर्व पत्नी अमृता सुरेशन आणि त्यांच्या मुलीने तक्रार दाखल केली होती. बालावर सोशल मीडियावर बदनामी करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणं आणि मुलांप्रती क्रूर वागणूक असे आरोप करण्यात आले आहेत. बालाच्या व्हिडीओंमुळे मुलीवर भावनिकदृष्ट्या परिणाम झाल्याचाही उल्लेख अमृताने तिच्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी बालाचा मॅनेजर राजेश यालाही पोलिसांनी कोची इथून अटक केली आहे. कडवंत्र पोलिसांनी बालाला अटक केली असून त्याला लवकरच कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, बालावर महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याचा तसंच बाल न्याय कायद्यांशी संबंधित इतर आरोप करण्यात आले आहेत. 12 ऑक्टोबहर रोजी याप्रकरणी तीन जणांना संशयित म्हणून ओळखून गुन्हा दाखल करण्यात आला. यात बाला हा मुख्य आरोपी असून राजेश हा दुसरा आरोपी आणि फिल्म फॅक्टरीचा संस्थापक अनंतकृष्णन हा तिसरा आरोपी आहे.

‘न्यूज 9’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, बालासोबत गेल्या तीन वर्षांपासून काम करणाऱ्या त्याच्या ड्राइव्हरने त्याच्याविरोधात पुरावे दिले आहेत. अमृताला अनेकदा बाळाकडून मारहाण होताना पाहिल्याचं संबंधित ड्राइव्हरने म्हटलंय. मारहाणीच्या घटना या वारंवार घडल्याचंही त्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर मुलगी अवंतिका (12 वर्षे) आणि इतर नातेवाईकांसमोरही बालाने वारंवार अमृतावर हात उचलल्याचा खुलासा ड्राइव्हरने केला आहे.

हे सुद्धा वाचा

बालाच्या ड्राइव्हरने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ‘आता त्यांचं नातं संपुष्टात आल्याने मला काहीच लपवण्याची गरज नाही. बालाने तिला खूप वाईट वागणूक दिली आहे. या गोष्टीचा प्रत्यक्षदर्शी मी स्वत: आहे. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आहेत. त्यासाठी तिने उपचार घेतले आहेत. या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरच घडल्या आहेत’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

याआधी बालाने त्याच्या पूर्व पत्नीवर काही आरोप केले होते. अमृता त्याला मुलीची भेट होऊ देत नसल्याचं त्याने म्हटलं होतं. अमृता आणि बालाच्या मुलीनेही इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे. वडिलांच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला आणि तिच्या आईला ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, त्याविषयी ती या व्हिडीओमध्ये व्यक्त झाली.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.