Jallikattu | ‘जल्लीकट्टू’ची ऑस्कर शर्यतीत एंट्री, मल्याळम चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार!

93व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सहभगी होण्यासाठी तब्बल 27 चित्रपटांमध्ये चुरस रंगली होती. या 27 चित्रपटांमधून अखेर ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली आहे.

Jallikattu | ‘जल्लीकट्टू’ची ऑस्कर शर्यतीत एंट्री, मल्याळम चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार!
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 4:55 PM

मुंबई : नव्या वर्षात पार पडणाऱ्या 93व्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात मल्याळम चित्रपट ‘जल्लीकट्टू’ला (Jallikattu) नामंकन प्राप्त झाले आहे. 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस येथे पार पडणाऱ्या ‘93व्या अकादमी अवॉर्ड्स’मध्ये भारताने अधिकृत प्रवेश केला आहे (Official Oscar Entry). फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांच्या ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली आहे. ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म फॉरेन लँग्वेज या विभागात भारताचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे (Malayalam Film ‘Jallikattu’ Is India’s Official Oscar Entry).

(Malayalam Film ‘Jallikattu’ Is India’s Official Oscar Entry)

93व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सहभगी होण्यासाठी तब्बल 27 चित्रपटांमध्ये चुरस रंगली होती. या 27 चित्रपटांमधून अखेर ‘जल्लीकट्टू’ची निवड झाली आहे. या स्पर्धेत शुजित सरकारचा ‘गुलाबो सीताबो’, सफदर रेहानाचा ‘चिप्पा’, हंसल मेहतांचा ‘छलांग’, चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’, विधु विनोद चोप्रांचा ‘शिकारा’, अनंत महादेवनचा ‘बिटरस्वीट’, रोहेना गगेराचा ‘इज लव्ह इनफ सर’, गीतू मोहनदासचा ‘मुथोन’, नीला माधव पांडा यांचा  ‘कलिरा अतीता’, अनविता दत्तचा ‘बुलबुल’, हार्दिक मेहताचा ‘कामयाब’ आणि सत्यांनु-देवांशु यांचा ‘चिंटू का बर्थ डे’ या चित्रपटांचा समावेश होता.

केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित चित्रपट

ऑस्करसाठी पाठविलेला ‘जल्लीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ‘जल्लीकट्टू’ या वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते (Malayalam Film ‘Jallikattu’ Is India’s Official Oscar Entry).

चित्रपटाची कथा

वार्के आणि अँटनी नावाची दोन माणसे कत्तल खाना चालवत असतात. या ठिकाणी म्हशींची कत्तल केली जात असते. एका रात्री, एक म्हैस या कत्तल खान्यातून पळून जाते आणि खेड्यात शिरून तेथे धुडगूस घालते. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गावकरी एका शिकाऱ्याची मदत घेतात. हा शिकारी बंदूक घेऊन गावात पोहोचतो. मात्र, ही गोष्ट अँटनीला अजिबात आवडत नाही. यापुढे काय घडते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

ऑस्करची प्रतीक्षा

2019मध्ये पार पडलेल्या 92व्या अकादमी पुरस्कारासाठी झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ची ‘फॉरेन लँग्वेज’ विभागात निवड झाली होती. यापूर्वी, रीमा दास यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार्स’, अमित मसूरकरचा ‘न्यूटन’, वेट्री मारनची ‘विसारानई’ आणि चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटांना ‘फॉरेन लँग्वेज’ विभागात ‘ऑस्कर’साठी पाठवण्यात आले होते.मात्र, आतापर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाने ‘फॉरेन लँग्वेज’ या विभागात ऑस्कर पटकावलेला नाही.

(Malayalam Film ‘Jallikattu’ Is India’s Official Oscar Entry)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.