Pathaan | ‘पठाण’च्या स्क्रिनिंगदरम्यान चाहत्याने थिएटरमध्येच उधळले पैसे; पहा व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ जयपूरमधल्या एका थिएटरमधला असल्याचं कळतंय. तर व्हिडीओत पैशांची उधळण करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. अभिषेक पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे.

Pathaan | 'पठाण'च्या स्क्रिनिंगदरम्यान चाहत्याने थिएटरमध्येच उधळले पैसे; पहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 3:32 PM

जयपूर: सध्या सोशल मीडियावर ‘पठाण’ याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 25 जानेवारी रोजी शाहरुख खानचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या पाच दिवसांत त्याने जगभरात तब्बल 550 कोटी रुपयांची कमाई केली. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत असतानाच सोशल मीडियावर थिएटरमधील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये चाहत्यांकडून शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. सोशल मीडियावरील अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओत शाहरुखचा एक चाहता थिएटरमध्ये चक्क नोटांचा वर्षाव करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ जयपूरमधल्या एका थिएटरमधला असल्याचं कळतंय. तर व्हिडीओत पैशांची उधळण करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. अभिषेक पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ‘पठाण’च्या शोदरम्यान जेव्हा शाहरुखचं ‘झुमे जो पठाण’ हे गाणं सुरू होतं, तेव्हा प्रेक्षक स्क्रीनजवळ जमा होऊन जल्लोषाने नाचतात. त्याचवेळी अभिषेक पांडे नावाची ही व्यक्ती नोटांचा वर्षाव करत असते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याच्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. पठाण प्रदर्शित झाल्यापासून ‘मन्नत’ बंगल्याबाहेर शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुंबड गर्दी करत आहेत. शाहरुखनेही बंगल्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांच्या या शुभेच्छांचा स्वीकार केला.

शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘पठाणच्या घरी पाहुणाचार.. या सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार’, असं कॅप्शन लिहित त्याने व्हिडीओ शेअर केला. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी एक चाहता उत्तराखंडहून मुंबईला आला होता.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.