Manipur | कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है? मणिपूरमधील महिलांच्या धक्कादायक घटनेवर सेलिब्रिटी संतप्त

गेल्या काही महिन्यांपासून मौन बाळगलेल्या सेलिब्रिटींनीही अखेर त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने सर्वप्रथम याविषयी ट्विट केलं. त्यानंतर कुमार विश्वास, प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा यांनीसुद्धा ट्विट करत मणिपूरच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.

Manipur | कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं है? मणिपूरमधील महिलांच्या धक्कादायक घटनेवर सेलिब्रिटी संतप्त
Kumar Vishwas, Akshay Kumar and Meera ChopraImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 12:16 PM

मुंबई | 20 जुलै 2023 : मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. 4 मे रोजी घडलेल्या तिथल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मौन बाळगलेल्या सेलिब्रिटींनीही अखेर त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने सर्वप्रथम याविषयी ट्विट केलं. त्यानंतर कुमार विश्वास, प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा यांनीसुद्धा ट्विट करत मणिपूरच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.

कुमार विश्वास यांनी बिरेन सिंह यांना घेरलं

मणिपूरच्या घटनेवरून कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कुर्सी है तुम्हाला ये जनाजा तो नहीं है? कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते?’, असा सवाल त्याने या ट्विटद्वारे केला आहे.

हे सुद्धा वाचा

अक्षय कुमारचं ट्विट-

‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो. दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही अशी मी अपेक्षा करतो’, असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.

मीरा चोप्राने मणिपूरच्या घटनेबाबत सरकारने बाळगलेल्या मौनावर प्रश्न केला उपस्थित

प्रियांका चोप्राची बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्रानेही याविषयी ट्विट केलं आहे. ‘मणिपूरमध्ये महिलांचा विनयभंग, त्यांची विवस्त्र धिंड काढली जात आहे. हा व्हिडीओ धक्कादायक आहे. हे खरंच घडतंय का? जर या गोष्टींचा तुम्हाला राग येत नसेल तर काही होऊ शकत नाही. भाजपने ही गुंडगिरी थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा. मणिपूर हिंसाचाराबाबत बाळगलेल्या मौनावर प्रश्न उपस्थित होतोय’, असं तिने लिहिलं.

आपल्या ट्विट्समुळे सतत चर्चेत राहणाऱ्या कमाल आर. खान यानेसुद्धा मणिपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘मणिपूरमध्ये जे काही घडतंय, ते अत्यंत लज्जास्पद आणि घाणेरडं आहे. हा अत्याचार पाहिल्यानंतर जे लोक गप्प आहेत, ते एक नंबरचे निर्लज्ज आहेत. त्यांना माणूस म्हणण्याचा काहीच हक्क नाही’, असं त्याने म्हटलंय.

कॉमेडियन वीर दासने मणिपूर हिंसाचारावर ट्विट करत लिहिलं, ‘जेव्हा भयंकर घटना घडतात तेव्हा कोणतीही चूक न होता व्यवस्थेद्वारे आपल्या नेत्यांना लगेच त्याची माहिती मिळते. जेव्हा काही महिन्यांनंतर व्हिडीओ व्हायरल होतो, तेव्हा ट्विटरला त्याची माहिती असते. जर फक्त तेव्हा नेते प्रतिक्रिया देत असतील तर हा ट्विटरचा दोष आहे, भयंकर घटनांचा नाही. ते फक्त ऑनलाइन आक्रोशाची काळजी घेत आहेत, वास्तविक लोकांची नाही’, अशा शब्दांत त्याने निशाणा साधला आहे.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.