‘मन उडु उडु झालं’ फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठ; पहा फोटो

नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी ऋतुराज आणि रिसबुद लग्नबंधनात अडकले. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'मन उडु उडु झालं' फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठ; पहा फोटो
'मन उडु उडु झालं' फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 6:31 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘मन उडु उडु झालं’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता ऋतुराज फडके याने नुकतीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर प्रीती रिसबूद हिच्याशी त्याने लग्न केलं. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी ऋतुराज आणि रिसबुद लग्नबंधनात अडकले. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

27 जानेवारी रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. ‘सर्वसामान्य आयुष्य जगत असताना कधीतरी प्रेम तुम्हाला परीकथेसारखे क्षण देऊन जातं’, असं कॅप्शन देत ऋतुराजने हे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच त्याने प्रीतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती उखाणं घेताना दिसत आहे. प्रीतीचं उखाणं ऐकून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘लग्न करून माहेर सोडताना थोडंसं दु:ख जरी झालं.. ऋतुराजरावांचं नाव घेऊन मन उडु उडु झालं’ असं उखाणं प्रीतीने घेतलं. लग्नसोहळ्यात ऋतुराजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर प्रीतीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

ऋतुराजच्या लग्नाला ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतील कलाकारही उपस्थित होते. याच मालिकेतून ऋतुराजला प्रसिद्धी मिळाली. यामध्ये त्याने खलनायकी भूमिका साकारली होती. तर ऋतुराजची पत्नी प्रीती ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर आहे. प्रीतीचं युट्यूब चॅनल असून त्यावर ती विविध व्हिडीओ पोस्ट करते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.