मुलींच्या कॉलेजमधील बाथरूममध्ये एक तास अडकलेला मनोज वाजपेयी, नेमकं काय झालं होतं?

मनोज वाजपेयी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात

मुलींच्या कॉलेजमधील बाथरूममध्ये एक तास अडकलेला मनोज वाजपेयी, नेमकं काय झालं होतं?
मनोज बाजपेयी याची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर मनोज बाजपेयी चर्चेत आला.
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 10:03 PM

मुंबई : अभिनेते मनोज वाजपेयी हे बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजमुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले आहेत. या वेब सिरीजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. तसंच मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केलं आहे. मनोज वाजपेयी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. आताही मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत सोबत शेअर केला आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ते चक्क मुलींच्या कॉलेजमधील बाथरूममध्ये एक तास अडकले होते. आता हा प्रकार त्यांच्यासोबत घडला कसा आणि ते नेमके गर्ल्स कॉलेजमध्ये गेले कसे याबाबत आपण जाणून घ्या.

मनोज वाजपेयी यांना दिल्ली विद्यापीठाच्या SRCC कॉलेजच्या नाटक विभागात बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी मुलींचं एक नाटक होतं, मनोज वाजपेयी त्यावेळी कार्यशाळेसाठी तिथे गेले होते. त्यावेळी ते चुकून मुलींच्या बाथरूम मध्ये गेले, पण त्यानंतर समजलं की बाहेर काही मुली आहेत. मुली बाहेर असल्यामुळे ते बाथरूमच्या बाहेर येऊ शकत नव्हते. त्यामुळे ते मुलींच्या गप्पा टप्पा ऐकत बसले तसंच ते भीतीमुळे बाहेर देखील आले नाहीत. अशाप्रकारे ते एक तास बाथरूममध्ये तसेच अडकून राहिले होते. त्यानंतर नाटक विभागाच्या काही मुली मनोज यांना शोधत आल्या आणि त्यानंतर त्यांची बाथरूममधून सुटका करण्यात आली, मनोज वाजपेयींनी हा मजेशीर किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.

सध्या मनोज वाजपेयी त्यांचा आगामी चित्रपट एक बंदा काफी है या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे, त्यामुळे आता प्रेक्षक त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.