Manoj Bajpayee | ‘ही माझ्यासाठी अत्यंत लज्जास्पद बाब’; लेकीबद्दल असं का म्हणाला मनोज बाजपेयी?
बिहारमधील एका गावात जन्मलेल्या मनोज बाजपेयी यांचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक समस्यांचा आणि संघर्षाचा सामना केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा नकारही पचवावा लागला.
मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मनोज त्याच्या कुटुंबीयांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. मनोजने अभिनेत्री शबाना रझाशी लग्न केलं असून या दोघांना अवा ही मुलगी आहे. या मुलाखतीत मनोजने मुलीच्या हिंदी बोलण्याविषयी नाराजी व्यक्त केली. मुलीला नीट हिंदी भाषा बोलता येत नसल्याने माझ्यासाठी ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर अवाची हिंदी शिक्षिका या गोष्टीमुळे तिच्यावर खूप नाराज असल्याचंही त्याने सांगितलं. कारण अवाच्या वडिलांचं काम पाहता मुलीला हिंदी नीट बोलता येत असेल अशी शिक्षिकेची अपेक्षा होती.
मनोज म्हणाला, “हिंदी भाषा नीट शिकता यावी यासाठी अवाने मैत्रिणींसोबत सोप ओपेरा पाहायला सुरुवात केली आहे. तिला माझे चित्रपट पहायला आवडत नाहीत. पण ती खूपच मोकळी आहे. टायगर श्रॉफशी तिने स्वत:हून मैत्री केली. ती माझ्या बाघी 2 च्या सेटवर आली होती. एका सीनसाठी ती स्वत: ॲक्शनसुद्धा बोलली. ती माझ्या व्हॅनमध्ये आली आणि विचारलं की टायगर श्रॉफ कुठे आहे? मी माझा सीन शूट करून परत येईपर्यंत ती बाजूच्या व्हॅनमध्ये टायगरला भेटायला गेली. मी मनोज बाजपेयींची मुलगी आहे, अशी तिने स्वत:ची ओळखही त्याला करून दिली. ती खूपच संधीसाधू आहे. ती हिंदी शिकत नाहीये पण हिंदी चित्रपटांमधील कलाकार तिला आवडतात.”
View this post on Instagram
मुलीच्या हिंदी भाषेविषयी तो पुढे म्हणतो, “ती पूर्णपणे अंग्रेज आहे. तिला शिक्षिकेकडून ओरडा पडतो तरीसुद्धा ती ऐकत नाही. एकदा पालकांच्या मिटींगमध्ये तिची शिक्षिका म्हणाली, ‘मनोजजी हे काय आहे? तुमची मुलगी माझ्या वर्गात शिकते याचा मला खूप आनंद झाला होता. पण ती हिंदी भाषेत अजिबात बोलत नाही.'” शिक्षिकेसमोर मुलीला तोडकं-मोडकं हिंदी बोलताना ऐकून खूपच लाज वाटल्याचं मनोजने सांगितलं.
बिहारमधील एका गावात जन्मलेल्या मनोज बाजपेयी यांचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक समस्यांचा आणि संघर्षाचा सामना केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा नकारही पचवावा लागला.