हिंदूस्थान आमच्या बापाचाच… सांगत अभिनेता म्हणाला, ‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय…’
'औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय...', भावना व्यक्त करत अभिनेत्याची सरकारकडे मोठी मागणी; म्हणाला, 'हिंदूस्थान आमच्या बापाचा होता आणि राहिल...', सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे...

अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे, तर दुसरीकडे सिनेमावरून अनेक वाद देखील निर्माण होत आहेत. सध्या महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर वाद सुरु आहे. वाद सुरु असताना प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर याने मोठं वक्तव्य केलं आहे.
‘औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा… आणि हिंदूस्थान आमच्या बापाचा होता आणि राहिल…’ लेखकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. ‘महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी… यावरून अनेक वाद होत आहे. औरंगजेबाची कबर तोडावी अशी अनेकांची मागणी आहे… मला असा बिलकूल वाटत नाही. पण ती कबर काढून टाकावी? जेव्हा आपण हिंदू रामजन्मभूमीवर श्री रामाचं मंदिर बांधत होतो, तेव्हा काही लोक आपल्याला ज्ञान देत होते की देव प्रत्येक कणात आहे, मग मंदिर बांधण्याची काय गरज आहे वगैरे! त्या जागेवर शाळा, रुग्णालय बांधा… असं अनेक जण म्हणाले.




View this post on Instagram
मनोज पुढे म्हणाला, ‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाहीये, तर त्यावर शौचालय बांधा… अशी माझी मागणी आहे. आपण सनातनी आहोत. आपण त्या खुन्याला किमान किमान युरिया आणि मीठ दान करू शकतो. आणि जे म्हणतात नाही भारत कोण्च्या बापाचा नीही . तर मला सांगायला आवडेल की, ‘हिंदूस्थान आमच्या होता आणि राहिल..’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मनोज मुंतशीर याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील मनोज याच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. मनोज कायम वादग्रस्त प्रकरणावर स्वतःचं परखड मत मांडत असतो. सोशल मीडियावर देखील मनोज कायम सक्रिय असतो.