ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह कमेंटनंतर अनुराग कश्यपला प्रसिद्ध लेखकाचं खुलं आव्हान; “जर दमच नाही तर..”
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या कमेंटनंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरून आता लेखक मनोज मुंतशीर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत अनुराग यांना सुनावलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना मुंतशीर यांनी खुलं आव्हानसुद्धा दिलं आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करून नवा वाद ओढवून घेतला आहे. ब्राह्मणांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यावरून आता अनेकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी अनुराग यांना खुलं आव्हान दिलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत मनोज यांनी त्यांना सुनावलं आहे. “जर तुम्ही कमाई कमी असेल, तर खर्चावर लगाम लावा आणि जर तुमचं ज्ञान कमी असेल तर शब्दांवर लगाम लावा. अनुराग कश्यप– तुझी कमाई आणि ज्ञान हे दोन्ही कमी आहेत. ब्राह्मणांच्या वारशाची प्रतिमा मलिन करण्याची तुझ्यात एक इंचसुद्धा क्षमता नाही. तरीही तू इच्छा जाहीर केलीच आहेस तर मी तुझ्या घरी काही फोटो पाठवतो. त्यानंतर तू ठरव की तुला कोणावर तुझं घाणेरणं पाणी टाकायचं आहे?”, असं मुंतशीर यांनी म्हटलंय.
“आचार्य चाणक्य, चंद्रतिवारी शेखर आझाद, बाजीराव बल्लाळ, देव परशुराम, रामकृष्ण परमहंस, आदि शंकराचार्य, मंगल पांडे, अटल बिहारी वाजपेयी, तात्या टोपे, राजगुरू, रामधारी सिंह दिनकर, परम वीर कॅप्टन मनोज पांडे, बाळ गंगाधर टिळक, पंडित दिनदयाल उपाध्याय, पंडित श्रीराम शर्मा आचार्य, पंडित भीमसेन जोशी, संगीत सम्राट तानसेन, लता मंगेशकर, राणी लक्ष्मीबाई, महाकवी कालिदास, गोस्वामी तुलसीदास.. तुझ्यासारखे असंख्य द्वेष करणारे नाहीसे होतील, पण आमचा गौरवाशाली वारला संपुष्टात येणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.




View this post on Instagram
मनोज मुंतशीर यांनी अनुराग कश्यप यांना बोलण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की जर कश्यप हे त्यांच्या शब्दांचं समर्थन करू शकत नाही, तर त्यांनी आपल्या मर्यादेत राहायला शिकलं पाहिजे आणि आपली मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. ते पुढे म्हणाले, “मी तुला खुलं आव्हान देतो. मी सांगितलेल्या 21 नावांपैकी एक नाव निवड आणि मी त्यांचा फोटो तुला नक्की पाठवेन. जर तुला तुझ्या शब्दांवर टिकून राहण्याची हिंमत नसेल तर तू आपल्या मर्यादेत राहायला शिक.”
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर टिप्पणी करताना अनुराग कश्यप यांची जीभ घसरली. ब्राह्मण समुदायाबद्दल त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रचंड राग व्यक्त केला. या टीकेनंतर अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली. यानंतर मनोज मुंतशीर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.