अशाने सांप्रदायिक वाद निर्माण होतील; बिग बॉसच्या निर्मात्यांवर भडकला अभिनेता

बिग बॉसच्या घरात सध्या मुनव्वर फारुकी अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. आयेशा खानने त्याच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. त्यानंतर मुनव्वरला तिची माफी मागावी लागली. या संपूर्ण प्रकरणावरून आता एका माजी स्पर्धकाने बिग बॉसच्या निर्मात्यांना फटकारलं आहे.

अशाने सांप्रदायिक वाद निर्माण होतील; बिग बॉसच्या निर्मात्यांवर भडकला अभिनेता
bigg boss 17Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 11:38 AM

मुंबई : 13 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरातील तगडा स्पर्धक मानला जाणारा मुनव्वर फारुकी सध्या त्याच्या वादग्रस्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात आयेशा खानची एण्ट्री झाल्यापासून त्यावर विविध आरोप करण्यात येत आहेत. मुनव्वर याने फसवणूक केल्याचा आरोप आयेशाने केला आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये आयेशाने मुनव्वरच्या खासगी आयुष्याविषयी बरीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी तो इतर पाच मुलींना डेट करत होता, अशी पोलखोल आयेशाने केली. याप्रकरणी आता ‘बिग बॉस 10’चा स्पर्धक आणि अभिनेता मनु पंजाबीने बिग बॉसच्या निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. एखाद्याचं खासगी आयुष्य अशा पद्धतीने नॅशनल टेलिव्हिजनवर उघड करावं का, असा सवाल त्याने निर्मात्यांना केला.

आयेशाने केलेल्या आरोपांनंतर नॉमिनेशन टास्कदरम्यान दोघांमध्ये मोठा वाद झाला. यामुळे इतर स्पर्धकांसमोर मुनव्वरविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. मुनव्वरने नेमकं सत्य काय आहे, हे सर्वांना सांगितलं आणि आयेशाचीही माफी मागितली. मात्र या सर्वांत त्याच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याचं मनु पंजाबीने म्हटलंय. बिग बॉसच्या निर्मात्यांच्या या प्लॅनमुळे सांप्रदायिक दंगली होऊ शकतात, असं मोठं वक्तव्य मनु पंजाबीने केलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मनु पंजाबी म्हणतो, “बिग बॉस तुम्ही आम्हाला नेमकं काय विकत आहात? एखादी व्यक्ती भांडी विकून, बूट पॉलिश करून, सन्मान कमावून बिग बॉसच्या घरात आला आहे. इथून पुढे त्याला आणखी मोठं व्हायचं आहे. पण तुम्ही तर त्याचं पुढचं आणि मागचं आयुष्य सर्वकाही टेलिव्हिजन उघड करताय. एकीकडे तुम्ही कोरियातून सेलिब्रिटीला घेऊन येत आहात. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा अनादर करत आहात.“

‘लॉक अप’ या शोदरम्यान ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरासोबत मुनव्वरचं नाव जोडलं गेलं होतं. तिनेसुद्धा मुनव्वर याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लॉक या शोमध्ये अंजली आणि मुनव्वर जवळपास 72 दिवस एकत्र होते. नाझिला, आयेशा आणि अंजली या तिघींसोबतच्या नात्यावरून मुनव्वरची सोशल मीडियावर खिल्लीदेखील उडवली गेली होती. तर एकाच वेळी दोन मुलींना डेट करत असल्याचं आयेशाने म्हटलं होतं. मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड नाझिला सिताशी हिनेसुद्धा मुनव्वर याच्यावर खोटं बोलण्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर त्या खोटारडेपणाला कंटाळून ब्रेकअप करत असल्याचं तिने जाहीर केलं.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.