Manushi Chhillar: मानुषी छिल्लर ‘या’ बिझनेसमनला करतेय डेट; दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर

मानुषी छिल्लर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये? 'या' बिझनेसमनशी जोडलं जातंय नाव

Manushi Chhillar: मानुषी छिल्लर 'या' बिझनेसमनला करतेय डेट; दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर
मानुषी छिल्लरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 1:16 PM

मुंबई: ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 25 वर्षीय मानुषी ही तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असलेल्या एका व्यावसायिकाला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबद्दल अद्याप तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मानुषी काही दिवसांपूर्वीच ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही.

मानुषी ही व्यावसायिक निखिल कामतला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. 35 निखिल हा ‘झेरोधा’ या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीचा सहमालक आहे. गेल्या वर्षभरापासून हे दोघं डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र रिलेशनशिपबद्दल त्यांनी कमालिची गुप्तता पाळली आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच मानुषी आणि निखिल एकत्र राहू लागले, अशीही माहिती समोर येत आहे. मानुषी सध्या तिच्या बॉलिवूडमधील करिअरवर लक्ष केंद्रीत करत असल्याने तिला खासगी आयुष्याविषयी फारसं बोलायचं नाही. दोघांच्याही कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना मात्र या रिलेशनशिपची संपूर्ण माहिती आहे.

निखिल कामतने 18 एप्रिल 2019 रोजी इटलीतील फ्लॉरेन्समध्ये अमांडा पुर्वांकराशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या वर्षभरातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

मानुषीने 2017 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली, मात्र या पाच वर्षांत तिच्या डेटिंगच्या चर्चा कधीच नव्हत्या. या वर्षी तिने अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने संयोगिताची भूमिका साकारली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.