लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर अनेक सेलिब्रिटी, फक्त सलमान नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींना देखील धोका
Salman Khan: फक्त सलमान खान नाही तर, 'या' सेलिब्रिटींच्या जीवाला देखील धोका, गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर प्रसिद्ध सेलिब्रिटी... गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा
Salman Khan: ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गुंड लॉरेन्स बिश्नोई सतत अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान, बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. म्हणून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, भाईजानने स्वतःच्या सुरक्षेसाठी तब्बल 2 कोटी रुपयांची बुलेट प्रुफ कार खरेदी केली आहे. सलमान खान याच्या जीवाला धोका असल्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
सांगायचं झालं तर, लॉरेन्स बिश्नोईच्या हीट लिस्टवर फक्त सलमान खान नाही तर, आणखी सेलिब्रिटी देखील आहेत. सध्या लॉरेन्स गुजरातच्या साबरमती कैद आहे. लॉरेन्सच्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये 700 हून अधिक सदस्यांचा समावेश आहे.यासोबतच पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोईने स्वीकारली. बाबा सिद्दिकीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी बिश्नोई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धक्कादायक घटनेची जबाबदारी स्वीकारली. पुढे लॉरेन्सच्या निशाण्यावर असलेले सेलिब्रिटी…
सलमान खान – 26 वर्षांपूर्वी झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई याने सलमान खानवर निशाणा साधला होता. बिश्नोई समाजातील लोकांसाठी काळ्या हरणाला देव मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.
झीशान सिद्दीकी – बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी देखील लॉरेन्सच्या रडारवर आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी धरमराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांनी पोलिसांकडे कबुली दिली आहे की, ते 12 ऑक्टोबर रोजी झीशानला मारण्यासाठी आले होते, मात्र त्यांनी त्याच्या वडिलांना गोळ्या झाडल्या.
शगनप्रीत – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचा मॅनेजर शगनप्रीत देखील लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. शगनप्रीतला टार्गेट करण्यामागचे कारण म्हणजे लॉरेन्सला वाटतं की, 2021 मध्ये शगनप्रीतने मोहालीमध्ये ज्यांनी त्याचा जवळचा मित्र विकी मिड्दुखेडा मारला त्याला आश्रय दिला होता.
मुनव्वर फारुकी देखील लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. मुनव्वरवर हल्ला करण्याची योजना दिल्लीत होती. मात्र, वेळीच पोलिसांनी मुनव्वरला वाचवून मुंबईला पाठवलं. सध्या बॉलिवूडवर लॉरेन्सची दहशत पाहायला मिळत आहे.