AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘कॉफी’ 14 जानेवारीला प्रदर्शित होणार

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा कॉफी हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीला रिलीज होतोय.

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची 'कॉफी' 14 जानेवारीला प्रदर्शित होणार
कॉफी सिनेमा
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 1:00 PM

कॉफी सिनेमा: कॉफी दिवसाची फ्रेश सुरुवात करते, कॉफीमुळे मूड फ्रेश करते. तसंच या वर्षाची सुरुवात अशाच फ्रेश सिनेमाने होतेय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा कॉफी हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात प्रेमाचा ट्रँगल दाखवण्यात आलाय. स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, आणि कश्यप परुळेकर हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

कॉफी या मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. आणि १४ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. तन्वी फिल्म्सचा हा सिनेमा नितीन कांबळे यांनी दिग्दर्शित केलाय. लॉकडाऊननंतर मराठी चित्रपट तेजीत आहेत. मराठी सिनेमांना प्रेक्षक चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेल्या झिम्मा या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. पांडू सिनेमाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या वर्षाची सुरूवात ‘कॉफी’ने होतेय. त्यामुळे मराठी सिनेमांसाठी हे वर्ष फ्रेश असणार, असं म्हणायला हरकत नाही.

स्पृहा जोशीने या आधीही उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. लॉस्ट अॅण्ड फाउंड, होम स्वीट होम, अ पेईंग घोस्ट, देवा आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही ही काही तिच्या निवडक सिनेमांची नावं आहेत. तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात. सिनेमांसोबतच तिच्या कविताही वाचकांना आपल्याश्या वाटतात.

सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहाने लॉस्ट अॅण्ड फाउंड या चित्रपटात एकत्र काम केलंय. तसंच क्लासमेट, झिम्मा, गुलाबजाम, ऑनलाईन बिनलाईन अशा अनेक चित्रपटांमधून सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर झळकलाय. स्पृहा आणि सिद्धार्थचा कॉफी सिनेमा परवा प्रदर्शित होतोय. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या

छोटी संबंधित बातम्या परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

‘खास रे’चे नवीन गाणे लाँच, आता महाराष्ट्रामध्ये ‘बेक्कार थंडी’ गाण्याचीच हवा!

Sakshi Tanwar | 900 रुपयांची नोकरी ते दीड लाख रुपये Per Day! साक्षी तंवरचा रिअल लाईफ प्रवास

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.