मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.
'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.
गौतमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सेटवरील गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिनं हिरव्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
‘तेरे नैना हस दिए, बस गए मेरे दिल मे, तेरे नैना’ या गाण्यात्या सुंदर ओळी कॅप्शनमध्ये देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.