VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

मानसी नाईकने नुकतंच एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपल्याला आलेल्या गलिच्छ अनुभवाबद्दल सांगितलं. (Manasi Naik Troll Budhwar Peth)

VIDEO | तू बुधवार पेठेतील ** आहेस इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर
अभिनेत्री मानसी नाईक
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 4:26 PM

मुंबई : अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आपल्यावरील टीकेबद्दल बरेचसे कलाकार खुलेपणाने सांगतातही. नुकतंच मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने आपल्याला सोशल मीडियावर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी शिवराळ कमेंट इन्स्टाग्राम युझरने तिच्या फोटोवर केली होती. त्याला मानसी नाईकने सडेतोड उत्तर दिलं. (Marathi Actress Manasi Naik answers Instagram Comment Troll about Budhwar Peth)

मानसीच्या इन्स्टाग्राम फोटोवर गलिच्छ कमेंट

मानसी नाईकने नुकतंच एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपल्याला आलेल्या गलिच्छ अनुभवाबद्दल सांगितलं. एका युझरने मानसीच्या पोस्टवर “तू बुधवार पेठेतील ** आहेस” अशी कमेंट केली होती. “मला हसूही आलं आणि वाईटही वाटलं, की त्याने हे लिहिताना दोनदा विचारही नाही केला.” असं मानसी म्हणाली.

मानसी नाईकचे सडेतोड सवाल

‘बुधवार पेठेतील मी आहे हे समजायला, तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? दुसरी गोष्ट, बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात, तुम्हाला काय वाटतं, त्या तिथे का आहेत? त्या स्वतःचं पोट भरण्यासाठी ते काम करतात. त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्या मेहनत करतात, हा विचार न करतात ती एक शिवी म्हणून अभिनेत्रीला वापरता’ असे म्हणत मानसीने त्याला झापलं.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

(Manasi Naik Troll Budhwar Peth)

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

मानसी नाईक काही महिन्यांपूर्वीच बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. त्यावेळीही तिला लग्नावरुन अनेकांनी ट्रोल केलं होतं. तुला मराठी मुलगा मिळाला नाही का? असा प्रश्न विचारुन तिला बेजार करण्यात आलं होतं.

शशांक केतकरही ट्रोल

शशांकच्या फेसबुक पेजवरील एका पोस्टवर यूझरने अश्लाघ्य भाषेत प्रश्न केला होता. शशांकचा पारा चांगलाच चढला आणि त्याने संबंधित व्यक्तीला सुनावत कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल, असा सल्ला दिला. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.

संबंधित बातम्या :

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

(Marathi Actress Manasi Naik answers Instagram Comment Troll about Budhwar Peth)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.