गाणं ऐकता ऐकता ‘त्याने’ संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं?, गाणं कोणतं होतं?; वाचाच!

'भीमराज की बेटी' फेम गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या आयुष्यात अनेक किस्से घडले आहेत. (a man was crying when pratap singh bodade sing song, read story)

गाणं ऐकता ऐकता 'त्याने' संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं?, गाणं कोणतं होतं?; वाचाच!
pratap singh bodade
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 6:31 PM

मुंबई: ‘भीमराज की बेटी’ फेम गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या आयुष्यात अनेक किस्से घडले आहेत. अनेक किस्से सुखद आहेत, तर काही मनाला चटका लावणारे आहेत. त्यांच्या एका गाण्याबाबतचा एक किस्सा असाच आहे. मनाला चटका लावणारा. काय होता हा किस्सा, वाचा प्रतापसिंग बोदडे यांच्याच शब्दातून. (a man was crying when pratap singh bodade sing song, read story)

पाच हजार उधळले

15-16 वर्षापूर्वीची ही घटना असेल. चेंबूरच्या लालडोंगरमध्ये प्रतापसिंग बोदडे यांचा गायिका सुषमादेवींसोबत गाण्याचा सामना होता. त्यावेळी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वस्त्यांमध्ये कार्यक्रम व्हायचे. गाणं सुरू असताना एखादं कडवं किंवा गाणं आवडलं तर लोक 100, 200 ते 500 रुपये गायकाला भेट म्हणून द्यायचे. तसेच पैसे देऊन गाण्याची फर्माईशही करायचे. बोदडे यांनी या सामन्यात एक गाणं म्हटलं.

तुझं माहेराला जाणं आहे, लय जीव घेणं, तुला व्यथा माझी सांगू मी काय, तुझ्याविना झोप येत नाय !!धृ!! नित माहेरी जाणं आता सोडावं, काट्यावरून काळीज माझं ना ओढावं, जीव हा किती किती जाळू आता, उशी किती किती कवटाळू आता, तुझं रुप डोळ्यापुढं येता झोप माझी उडं, रात अशीच जागून जाय !!१!!

बोदडे हे गाणं गात होते आणि समोर बसलेला एक मद्यधुंद शिक्षक त्यांच्यावर पैसे उधळत होता. गाणं संपेपर्यंत त्याने बोदडेंवर हजार पाचशेच्या नोटा उधळल्या. एवढ्या मोठ्याप्रमाणावर हा शिक्षक पैसे उधळत असल्याचे पाहून बोदडेही विचलीत झाले. त्यांनी त्याने दिलेली प्रत्येक नोट बाजूला ठेवली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी हा पैसा मोजला तर पाच हजार रुपये जमा झाले होते. बोदडे यांनी सकाळीच त्या शिक्षकाचे घर गाठले आणि त्याला ही संपूर्ण रक्कम परत केली. गाण्यावर संपूर्ण पगार उधळणारा हा शिक्षक नंतर ढसाढसा रडू लागला. या गाण्याचा आणि आपल्या जीवनाचा प्रत्यक्ष संबंध असल्याचं त्याने सांगितलं. ‘हे पैसे मला देऊन मला जोडा मारू नका. तुम्हाला द्यायला माझ्याकडे आणखी पैसे नव्हते म्हणून मला रडू येत होते’, असं सांगत या शिक्षकाने पैसे घेण्यास ठाम नकार दिला. या घटनेमुळे बोदडेही हेलावून गेले होते.

दहा मिनिटात गाणं सूचलं

बोदडे यांचं ‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं त्याकाळी खूप गाजलं होतं. या गाण्याची जन्मकथाही रंजक आहे. 32 वर्षांपूर्वी बोदडे यांनी अवघ्या दहा मिनिटात हे गाणं लिहिलं होतं. त्यावेळी ते वेस्टर्न रेल्वेत विरारला नोकरीला होते. सेकंड शिफ्ट करून घरी आल्यानंतर छोटी मुलगी रागिणीचा ते लाड करू लागले. तिला ते बाली म्हणायचे. बालीला खेळवता खेळवता त्यांना हे गाणं सूचलं आणि ते प्रचंड लोकप्रियही ठरलं. भारताप्रमाणेच पाकिस्तान, अरब देश, कॅनडा आणि अमेरिकेपर्यंत हे गाणं पोहोचलं होतं. उत्तर प्रदेशात तर बसपा नेत्या मायावती यांना भीमराज की बेटी असंच संबोधलं जातं. यावरून हे गाणं किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज येतो.

दलाई लामांवर स्वागत गीत लिहिलं

ज्येष्ठ आंबेडकरी नेते दादासाहेब रुपवते यांनी 9 जानेवारी 1986 रोजी परळच्या कामगार क्रिडा भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आले होते. दलाई लामांच्या स्वागतासाठी बोदडेंवर स्वागत गीत लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्वत: हे गाणं लिहिलं आणि गायलं. त्यांना भिकाजी भंडारे, गोविंद म्हशीलकर, शांता भोसले आणि शकिला बानू पुनवी या गायकांनी कोरस दिला होता.

वामनदादांची थाप

प्रतापसिंग बोदडे यांची गाणी वास्तवादी असतात. अत्यंत सोप्या शब्दात ते गाणं लिहितात. त्यांची गाणी अलंकारीक नसतात, पण काळजाला भिडतात. त्यांचं ‘थांबा हो थांबा, गाडीवान दादा…’ हे गाणं ऐकून महाकवी वामनदादा कर्डकही भारावून गेले होते. त्यांनी हे गाणं ऐकल्यावर बोदडेंच्या पाठिवर थाप देत कवी म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तबही केला होता. ते गाणं होतं…

थांबा हो थांबा, गाडीवान दादा, बाळ एकटा मी भीवा माझे नाव, राहिले फार दूर माझे गाव, गाडीत घ्या हो मला…. (साभार, आंबेडकरी कलावंत) (a man was crying when pratap singh bodade sing song, read story)

संबंधित बातम्या:

मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!

‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का?

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!

(a man was crying when pratap singh bodade sing song, read story)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.