प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमात झळकणार प्रसिद्ध अभिनेता

Actress Prajkyta Mali Phullwanti Movie : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी एक पोस्टर रिव्हील झाल्यानंतर आता एक नवं पोस्टर समोर आलं आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' सिनेमात झळकणार प्रसिद्ध अभिनेता
फुलवंती सिनेमाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 2:20 PM

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात आपल्यासमोर 11 ॲाक्टोबरला भेटायला येणार आहे. यात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा; अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. सोबत ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत चतुरस्त्र प्राजक्ता माळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्राजक्तासोबत प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी हा देखील स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर रिलिज झालं आहे. यातून गश्मीरच्या भूमिकेचा लूक समोर आला आहे.

गश्मीर कोणती भूमिका साकारणार?

छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री! श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती! पेशव्यांच्या दरबारात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार आहे. व्यकंट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची किर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पाहायला मिळणार आहे. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.

गश्मीरकडून आनंद व्यक्त

अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटांसह, हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता गश्मीर महाजनीने वेगळी ओळख निर्माण केली. गश्मीर ‘फुलवंती’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तितकाच उत्सुक आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची ही दमदार कथा आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका करता असल्याचा आनंद गश्मीरने व्यक्त केला.

‘फुलवंती’ या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण तरडे यांनी केलं आहे. दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.