‘संघर्षयोद्धा’नंतर रोहन पाटीलचा नवा सिनेमा; ‘राजाराणी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

Actor Rohan Patil New Movie Rajarani : 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या सिनेमानंतर अभिनेता रोहन पाटील याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजाराणी' हा त्याचा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काय आहे सिनेमाची गोष्ट? वाचा सविस्तर...

'संघर्षयोद्धा'नंतर रोहन पाटीलचा नवा सिनेमा; 'राजाराणी' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
राजाराणी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्जImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 8:09 PM

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला ‘राजाराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं आहे. 20 सप्टेंबर 2024 पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ या सिनेमानंतर अभिनेता रोहन पाटील याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘राजाराणी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

‘राजाराणी’ चित्रपटाची थरारक प्रेमकहाणी 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी ‘राजाराणी’ चित्रपटात झळकणार आहे. लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘एक थरारक प्रेमकथा’ अशी या सिनेमाची टॅग लाईन आहे. या सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

सिनेमाची गोष्ट काय?

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे.

‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला ‘राजाराणी’ आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत राजाराणी या चित्रपटाची कथा , पटकथा , संवाद , गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे , हर्षवर्धन वावरे , अनविसा दत्तगुप्ता , नागेश मोरवेकर हे आहेत तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी हे आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.