सहा बायका अन् प्रेमाचा गोंधळ; स्वप्नील जोशीच्या ‘बाई गं’ सिनेमाचं भन्नाट गाणं पाहिलंत का?

Actor Swapanil Joshi Prarthna Behre Bai G Movie : 'बाई गं' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सहा बायका अन् त्यांचा प्रेमाचा गोंधळ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वप्निल जोशी देखील या सिनेमात आहे. या सिनेमातील 'जंतर मंतर' हे गाणं रिलीज झालंय. वाचा सविस्तर..

सहा बायका अन् प्रेमाचा गोंधळ; स्वप्नील जोशीच्या 'बाई गं' सिनेमाचं भन्नाट गाणं पाहिलंत का?
बाई गं सिनेमाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 3:54 PM

अभिनेता स्वप्नील जोशी याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाई गं’ हा स्वप्निल जोशीचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात सहा बायका अन् त्यांच्या प्रेमाचा गोंधळ पाहायला मिळणार आहे. येत्या 12 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क्क सहा बायकांसोबत प्रेमाचा चा हा नक्की काय गोंधळ? ‘बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘जंतर मंतर’ रिलीज झालं आहे. अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना दिसतोय.

कधी रिलीज होणार?

प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो. पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायका असतील. तर त्या पुरुषाची हालत काय असेल? हे येत्या 12 जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल आणि आज या चित्रपटाची एक छोटीशी झलक ‘जंतर मंतर’ या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

सिनेमात कोण-कोण कलाकार आहेत?

स्वप्नील जोशी आणि त्याच्यासोबत सहा अभिनेत्री या सिनेमात आहेत. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान ह्यांनी जंतर मंतर ह्या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगवली आहे. मितवा नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांची जोडी ‘बाई गं’ ह्या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे ह्या जोडी चा एक वेगळाच फॅनबेस ह्या सिनेमा साठी उत्सुक आहे.

अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी “जंतर मंतर” ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर ह्यांनी लिहिले आहेत. “जंतर मंतर” हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पहायला मिळेल. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चं गाणं ‘जंतर मंतर’ रिलीझ होताच प्रेक्षकांना भुरळ घालतय हे नक्की… एक अभिनेता आणि तब्बल 6 अभिनेत्री हि संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. 12 जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.