AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishwari Deshpande | चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर, तर साखरपुडा अवघ्या एक महिन्यावर, आनंद अनुभवण्यापूर्वीच ईश्वरी देशपांडेने घेतला जगाचा निरोप!

ईश्वरी देशपांडे हिने एका मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्याची माहिती आहे. या सिनेमांचे चित्रिकरण पूर्ण झाले होते, मात्र स्वतःचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ishwari Deshpande | चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर, तर साखरपुडा अवघ्या एक महिन्यावर, आनंद अनुभवण्यापूर्वीच ईश्वरी देशपांडेने घेतला जगाचा निरोप!
Ishwari Deshpande
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 5:33 PM

मुंबई : पुण्यातील नवोदित अभिनेत्रीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची दुर्दैवी अखेर झाली. गोव्यात फिरायला गेलेल्या पुणेकर तरुणी आणि तिचा मित्राचा अपघाती मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील अरपोरा भागातील खाडीत कार कोसळून सोमवारी सकाळी त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये पुण्याची रहिवासी असलेली 25 वर्षीय अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (Actress Ishwari Deshpande) आणि तिचा 28 वर्षीय मित्र शुभम देडगे यांचा करुण अंत झाला.

दरम्यान, ईश्वरी देशपांडे हिने एका मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्याची माहिती आहे. या सिनेमांचे चित्रिकरण पूर्ण झाले होते, मात्र स्वतःचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत

सुनील चौथमल दिग्दर्शित ‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’ हा ईश्वरी देशपांडेचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पूर्ण झाले होते. चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असतानाच तिचे अपघाती निधन झाले. ‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’  या चित्रपटाबरोबरच ईश्वरी रवी जाधव, संजय जाधव, उमेश कुलकर्णी आणि सुजय डहाके सारख्या नामांकित चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्यास उत्सुक होती.

सुनील चौथमल दिग्दर्शित ‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’  या चित्रपटात ईश्वरी देशपांडेसोबत अभिनेते दीपक शिर्के, रवी काळे, किशोरी अंबिये आणि सुप्रिया पाठक हे प्रमुख कलाकार म्हणून दिसणार आहेत. या चित्रपटाला देव आशिष यांचे संगीत आणि रवी चंद्रन यांचे छायांकन लाभले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती जयश्री देशपांडे यांनी केली आहे.

‘प्रेमाचे साइड इफेक्ट्स’ या चित्रपटासोबतच ईश्वरीने आणखी एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. मात्र, या चित्रपटासंबंधित सगळी माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. ईश्वरी ही सोशल मीडिया इन्फ़्लुएन्सर म्हणून देखील खूप चर्चेत होती.

अवघ्या एका महिन्यावर साखरपुडा

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे हे दोघेही मागील एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. इतकेच नाही तर, अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झाले होते. दोघांनीही आपल्याला नात्याला पुढे नेण्याचे ठरवले होते. दोघेही पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होते. दरम्यान, संसार सुरु होण्यापूर्वीच नियतीने त्यांच्या हा आनंद हिरावून घेतला.

कसा घडला अपघात?

गोव्यात बारडेझ तालुक्यातील अरपोरा म्हणजेच हाडफाडे गावाजवळ सोमवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर गेली आणि तिथून खाडीत पडली. गाडी सेंट्रल लॉक झाल्यामुळे दोघांना कारबाहेर पडता न आल्याचा अंदाज आहे. सात वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्यातून गाडी आणि दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

आदल्या रात्री क्लबमध्ये गेल्याचा अंदाज

दरम्यान दोघांच्याही हातामध्ये रिस्टबँड आढळले आहेत. त्यामुळे अपघाताच्या आदल्या रात्री ते एखाद्या क्लबमध्ये गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. शुभम देडगे हा पुण्यातील कीर्कतवाडी भागातील रहिवासी होता, तर ईश्वरी देशपांडेही पुण्यात राहायची. दोघांच्याही कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिल्यानंतर ते गोव्याला यायला निघाले.

हेही वाचा :

Defamation Case : शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार, मीडिया प्लॅटफॉर्मचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचे आदेश

‘झॉलीवूड’ दिग्दर्शक तृषांत इंगळेची अभिनयात एंट्री, ‘मिडनाइट दिल्ली’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका!

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....