AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, ‘त्या’ लोकांवर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी 'तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल असं कृत्य खपवून घेणार नाही', असं आश्वासन दिलं आहे.

प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 'त्या' लोकांवर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन
प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 'त्या' लोकांवर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 10:38 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्राजक्ता माळी हिने काल पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना परळीतील इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या प्रकरणी प्राजक्ता माळी हिने आक्रमक पवित्रा घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. त्यानंतर प्राजक्ता माळी हिने आज मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्राजक्ताला सध्या सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे.

सुरेश धस यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि त्यांचा निषेध करावा, या मागणीसाठी प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. प्राजक्ता माळी हिने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. प्राजक्ताने मांडलेल्या मुद्द्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याची देखील माहिती आहे. महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्राजक्ताची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

यासोबतच हवी ती मदत महायुतीकडून केली जाईल. तसेच कुणाच्याही इमेजला गालबोट लागू देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्राजक्ता माळी हिचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी प्राजक्ताने आपली व्यथा मांडली. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री काम करतात तेव्हा त्यांना कशाप्रकारे बोललं जातं, त्यांना बदनाम केलं जातं, याबाबत कुठला तरी ठोस कायदा करावा आणि त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी प्राजक्ता माळी हिने केली आहे.

हे सुद्धा वाचा

पुरोगामी महिलांचा महाराष्ट्र आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा हा महाराष्ट्र आहे, त्यामुळे महिलांबाबत असं घडतं कामा नये, असं मत प्राजक्ताने मांडलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही कारवाई केली जाते का? सुरेश धस यांना काही विचारणा केली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

भेटीत काय-काय घडलं?

  • सुरेश धस यांना समज द्या, अशी मागणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांकडे केली.
  • आपल्याला विनाकारण सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने केली.
  • तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल असं कृत्य खपवून घेणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
  • चुकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.